उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
टेंभुर्णी ता. माढा येथील ज्येष्ठ कवी लेखक श्रीयुत हरिश्चंद्र पाटील यांना नुकतेच जीवन गौरव साहित्य पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.
साहित्य म्हणजे समाजाच्या भावना, विचार आणि संस्कारांना शब्दरूप देणारी जिवंत अभिव्यक्ती. आणि त्या सर्जनशीलतेचा सन्मान म्हणून यशोदा प्रतिष्ठान संचलित सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, शेळवे, ता. पंढरपूर यांच्या वतीने साहित्यिकांच्या विविध उत्कृष्ट साहित्यकृतींचा सनराईज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात मराठी साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील टेंभुर्णी यांना अत्यंत बहुमानाचा जीवन गौरव पुरस्कार आमदार अभिजीत (आबा) पाटील (माढा मतदार संघ), मा. आमदार दत्तात्रय सावंत सर (पुणे विभाग शिक्षक मतदार संघ), मा. संतोष बागल (जि. प. सदस्य), मा. अमित साळुंखे (जि. प. सदस्य) आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, आकर्षक स्मृतिचिन्ह व मानपत्र असे असून कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे, संस्थापक सचिव तथा ग्रामीण साहित्यिक अंकुश गाजरे आणि उपाध्यक्ष अजित लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा खूप उत्साहात व मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल हरिश्चंद्र पाटील यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा