उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयात कृषी निविष्ठा विक्रेताकरिता कृषी विस्तार सेवा पदविका (देसी अभ्यासक्रम) राबविला जातो. या अभ्यासक्रमाच्या बॅचची शिवार फेरी लवंग ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार रणजीत शिवाजी चव्हाण यांचे केळी प्रक्षेत्र येथे काढण्यात आली.
👇 *******: जाहिरात:***""****👇
या भेटीदरम्यान कृषी निविष्ठा विक्रेते यांना केळी लागवडीसंदर्भात आवश्यक माहिती रणजित चव्हाण यांनी दिली. सदरचा पदविका अभ्यासक्रम मॅनेज हैद्राबाद ,वनामती नागपूर व आत्मा सोलापूर यांच्यामार्फत राबवला जातो.हा अभ्यासक्रम 48 आठवड्याचा असून आठवड्यातून एक दिवस शनिवारी घेतला जातो. या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून ही शिवार फेरी प्रा. डी.जे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या भेटीस सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा