*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- वैदिक सोमयाग महोत्सवात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी सोमयागाच्या मुख्य वेदीचे विधीवत पूजन करण्यात आले. नरसिंहपूर गावातील १७ दांपत्यांच्या हस्ते पूजन सोहळा पार पडला. वैदिक मंत्रोच्चार आणि यज्ञीय विधींमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच सायंकाळी पाच वाजता सामुदायिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन करण्यात आले. हवनात ग्रामस्थ, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. श्रीसूक्ताच्या मंत्रोच्चारात संपन्न झालेल्या हवनामुळे वातावरणात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली. यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
रात्रीच्या सत्रात ह.भ.प. अंकुश महाराज रणखांबे यांचे“श्री ज्ञानेश्वरीमध्ये माउलींनी विस्तृत केलेले यज्ञदर्शन" विषयावर प्रभावी कीर्तन झाले. संत ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलेल्या यज्ञतत्त्वाचे सोप्या आणि ओघवत्या भाषेत विवेचन केले. त्यांच्या निरूपणाला उपस्थित भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सोमयागानिमित्त विविध मान्यवर कीर्तनकारांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे. आज ह.भ.प. मंदार गोखले यांचे कीर्तन होणार असून, २९ मे रोजी ह.भ.प. संदीप मांडके आणि ह.भ.प. संकेत भोळे यांची कीर्तन जुगलबंदी रंगणार आहे. तरी सदर कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीकांत दंडवते यांनी केले आहे.
फोटो - नरसिंहपूर येथे सोमयागानिमित्त गावातील १७ दांपत्यांच्या हस्ते सामुहिक श्रीसुक्त हवन पूजन सोहळा.
---------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा