*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
लातूर येथील जयक्रांती सेमी इंग्लिश स्कूल, लातूर येथे इयत्ता नववीमध्ये 95.33% गुण मिळवून अधिराज सुहास घोलप हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
जयक्रांती कॉलेज लातूर येथे पालक मेळावा व निकाल वितरण समारंभावेळी अधिराज घोलप याचा प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा प्रज्ञासेल जिल्हाध्यक्ष तथा वंदेमातरम शक्तीसेनाचे अध्यक्ष सुहास घोलप, प्रशालेचे प्राचार्य प्रशांत घार, पर्यवेक्षक तानाजी घाटके, शिक्षक विश्वनाथ सिंधीकुमठे, गिरीश रंदाळे, नंदकिशोर माळी, डॉ. गणपत माने, डॉ. सुशील शिंदे, संभाजी वारकड, रामदास लातूरे, अमर येळंबकर, संगमेश्वर भेंडेगावे, संकेत बनसोडे, गजानन घोंगडे, आकाश लोहार, अमित भालके, शिक्षिका नीता तांबळे, रंजना राशिनकर, गीता पाटील यांचेसह पालक, विद्यार्थी तसेच प्रशालेचे कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी अधिराज घोलप याच्या यशाचे अभिनंदनपर कौतुक केले. तसेच लातूर येथील अधिराज घोलप यांच्या यशाचे करमाळ्यातही कौतुक करण्यात येत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा