इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
जय साखर कारखाना उद्योग समूह चार राज्यातील १७ साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक न्याय देतो. त्यामुळे उद्योग समूहाची बदनामी करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सूतोवाच संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी केले.
ओंकार साखर कारखाना उद्योग समूह
हा राज्यात शेतकऱ्यांना सर्वात जास्त बाजारभाव देणारा उद्योगसमूह असून आजपर्यंत या उद्योग समूहाद्वारे १७ साखर कारखाने यशस्वीरीत्या चालवले जात आहेत. या उद्योग समूहाच्या विश्वसाहर्तेमुळे महाराष्ट्रासह, कर्नाटक तेलंगाना आणि उत्तर प्रदेश मध्ये देखील या उद्योगसमूहाद्वारे कारखाने चालवले जात आहेत. यंदा जवळपास ७५ लाख टन एवढे गाळप करण्यात आले असून येत्या गळीत हंगामाद्वारे एक कोटी टन एवढे गाळप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ओंकार उद्योग समूहाची घोडदौड महाराष्ट्र राज्य व देशात सुरू असून
या उद्योगसमूहाकडे १८००० कामगार, हजारो वाहतूक करणारे ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रक इत्यादी वाहने, २.९५ लाख टोळी चालक कामगार व ट्रॅक्टर ट्रक ड्रायव्हर व मुकादम ठेकेदार, आठ लाख शेतकरी एवढी मोठी संख्या असून महाराष्ट्र राज्यातील अडचणीत असणारे तसेच अनेक वर्ष बंद पडलेले साखर कारखाने या समूहाने यशस्वीरित्या चालवले आहेत. पारदर्शी काटकसरीचा कारभार नियोजन करत व उत्तम प्रशासन चालवत हा उद्योग समूह नावारूपास आला आहे. उद्योग समूहाचे मुख्य विश्वस्त बाबूराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वात आज पर्यंत सर्वात जास्त दर व कामगार वाहतूकदार यांना वेळेत पेमेंट देण्यात आलेले आहे. मात्र मागील काही दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक ओंकार उद्योग समूह व बोत्रे पाटील यांना बदनाम करण्यासाठी काही व्यक्ती व समूहाद्वारे सार्वजनिक बदनामी करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. संबंधींताकडून दोन हजार कोटी ते तीन हजार कोटी रुपये थकवण्यात आले आहेत अशी खोटी माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
यावर्षी राज्यात १४० खाजगी/सहकारी साखर कारखाना यांनी गळीत हंगाम चालवला असून १५ जानेवारी नंतरची २१०० कोटी रुपये एवढी एफआरपी राज्यातील १४० साखर कारखाने यांच्याकडे प्रलंबित आहे. ओंकार उद्योग समूहाच्या माध्यमातून चालवल्या जात असलेल्या १७ कारखान्यांकडून आज पर्यंत १८३० कोटी रुपये एवढे पेमेंट अदा करण्यात आले असून, वाहतूकदार यांना ७१० कोटी रुपये देण्यात आले आहेत. या वर्षीच्या गळीत हंगाम अखेर ओंकार उद्योग समूहाचा ६ हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर झाला असून, पुढच्या वर्षी किमान ७ हजार कोटी रुपये एवढा टर्न ओव्हर होणार आहे. मात्र काही दिवसा पासून उसबिला संदर्भात काही समाजविघातक घटकांकडून जाणीवपूर्वक खोट्या, दिशाभूल करणाऱ्या व बदनामीकारक अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून कारखान्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. जाणीवपूर्वक दिशाभूल करणे व शेतकरी कामगार, वाहतूकदार यांच्यामध्ये अफवा पसरवून समाजामध्ये ओंकार उद्योग समूहाची बदनामी करणाऱ्या काही सामाजकंटकांवर मागील दोन दिवसात राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी, वाहतूकदार, कामगार व संबंधित सर्व घटकांना आवाहन करण्यात येते कि, आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी थेट कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ओंकार उद्योग समूहाच्या वतीने ओमराजे बोत्रे पाटील यांनी केले आहे.
चौकट :
काही लोक सोशल मिडीयाच्या माध्यमातून चुकीची, दिशाभूल करणारी माहिती देवून ओंकार उद्योग समूहाची बदनामी करत आहेत. या प्रकरणी त्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यावर लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाणार असल्याची माहिती ओमराजे बोत्रे पाटील यांनी दिली.
चौकट :
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार पेट्रोल डिझेलमध्ये ३३% इथेनॉल मिक्स करण्याचे नवीन धोरण आल्यामुळे यावर्षी चे इथेनॉल व मोलासेस अजून पर्यंत विक्री केलेले नाही. त्याचे जवळपास ६०० कोटी रुपये ओंकार उद्योग समूहाला येणे आहेत. त्यामुळे फक्त महिनाभर उसाचे पेमेंट देणे उशीर झाला आहे. मात्र पुढील आठवड्यात शेतकऱ्यांचा एकही रुपया देणे शिल्लक राहणार नसून ओंकार उद्योग समूहाच्या माध्यमातून देशभरात पुढील हंगामात २२ कारखाने चालवले जाणार असून येत्या हंगामात एक कोटी टन गाळप करण्यात येईल अशी माहिती शेवटी ओमराजे बोत्रे पाटील यांनी दिली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा