Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ११ मे, २०२६

**पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या हक्कासाठी 10 70 झोपडपट्टीतील 65 कुटुंबाच्या जागेची नियमानुकूल सांगण्याची महसूल मंत्र्याकडे नगरसेविका दिपालीताई वाघमोडे निवेदनाद्वारे यांची मागणी*

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या हक्कासाठी दिपालीताई वाघमोडे आक्रमक झाल्या असून १०७० झोपडपट्टीतील ६५ कुटुंबांच्या जागा नियमानुकूल करण्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी केली आहे 

​अकलूजमधील बेघरांना हक्काचे घर मिळण्यासाठी नगरसेविका दिपालीताई वाघमोडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना  निवेदन दिले आहे


याबाबत सविस्तर वृत्त असे की

प्रधानमंत्री आवास योजना – 'सर्वांसाठी घरे' (२०२२) या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी अकलूज नगरपरिषद हद्दीत व्हावी, यासाठी नगरसेविका दिपालीताई वाघमोडे यांनी पुढाकार घेतला आहे. नगरपरिषद हद्दीतील १०७० झोपडपट्टीमधील ६५ लाभार्थ्यांच्या घरांच्या जागा नियमानुकूल कराव्यात, या मागणीचे निवेदन त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना करमाळा येथील एका कार्यक्रमादरम्यान दिले.


​अकलूज नगरपरिषद क्षेत्रातील अनेक गरजू लाभार्थी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, जागेच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न अपूर्ण आहे. विशेषतः १०७० झोपडपट्टी परिसरातील ६५ लाभार्थ्यांनी सरकारी जागेवर आपली घरे बांधली आहेत. या जागा शासनाच्या नियमाप्रमाणे संबंधित लाभार्थ्यांच्या नावे नियमानुकूल केल्यास, त्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणे सुलभ होणार आहे.

​करमाळा येथे आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन दिपालीताई वाघमोडे यांनी या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. "अकलूजमधील एकही गरीब कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित राहू नये, ही आमची भावना आहे. तांत्रिक अडचणींमुळे थांबलेले हे काम मार्गी लागावे, अशी विनंती आम्ही नामदारांना केली आहे," असे यावेळी वाघमोडे यांनी सांगितले.

​महसूल मंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या मागणीमुळे अनेक वर्षां पासून कच्च्या घरात राहणाऱ्या ६५ कुटुंबांच्या आशा आता पल्लवित झाल्या असून, परिसरातून या प्रयत्नांचे स्वागत होत आहे.

यावेळी उपस्थित नगरसेविका 

सौ दिपालीताई वाघमोडे  

अमोल माने सरचिटणीस भाजप अकलूज शहर  संतोष टकले संतोष वाघमोडे  शशिकांत रनवरे महावीर खंडागळे लक्ष्मण सदाफुले व आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा