*पुणे, डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*
जैन धर्म हा जगातील श्रमण संस्कृतीचे प्रतीक असणारा प्राचीन धर्म असून णमोकार महामंत्र ही जैन धर्माने संपूर्ण जगाला दिलेली अनमोल देणगी आहे असे प्रतिपादन राजस्थान सिंहीणी परमपूज्य यशकंवर महाराज यांची सुशिष्या
सुधाकंवर महाराज साहेब आदी ठाणा पाच यांनी केले.
पुणे कात्रज येथील आनंद दरबार मध्ये
साप्ताहिक नवकार महामंत्र जाप अनुष्ठान क्रमांक २८ रविवार दि. १० मे रोजी मोठ्या उत्साहात सामूहिक णमोकार महामंत्र पठण संपन्न झाले. यावेळी आध्यात्मिक मार्गदर्शन करताना महाराज साहेब बोलत होत्य
पूज्य श्री सुधाकंवरजी महाराज साहेब पुढे म्हणाल्या, णमोकार महामंत्रामध्ये ज्यांनी स्वतःच्या सर्व सांसारिक बंधने, आंतरिक शत्रू यावर विजय मिळवून जे मुक्त झाले ते अरिहंत, ज्यांनी मोक्ष मिळवला ते सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि सर्व साधू यांना नमस्कार केला आहे. या मंत्रांच्या १०८ जप पूर्ण केल्याने एक समेंद शिखरजी यात्रा केल्याचे पुण्य मिळते. या मंत्रांच्या जपाने आपण संसारातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक श्रावक श्राविका यांनी रोज णमोकार महामंत्राचा जप करणे ही काळाची गरज आहे. जगात भौतिक सुखे हात जोडून उभी आहेत मात्र संसारात स्वास्थ्य, संपत्ती आणि स्वजन हे शाश्वत नाहीत. त्यामुळे आपना सर्वांना योग्य समज, धार्मिक ज्ञान तसेच सदाचरण गरजेचे आहे. त्यामुळे आपण संसारातून मुक्ती मिळवण्यासाठी जैन धर्म आचारसंहितेचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यासाठी णमोकार महामंत्राचे जप करणे गरजेचे आहे. कारण संसारातून मुक्ती मिळवण्याचा हा शाश्वत राजमार्ग आहे.या वेली अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांचे
स्वागत आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. सुत्रसंचलन प्रमोद रांका यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जैन श्रावक संघ, दत्तनगर चे सर्व संचालक मंडळ, सदस्य यांनी प्रयत्न केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा