*तुळजापूर तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9222734765*
तुळजापूर शहरात बकरी ईद साठी मुस्लिम बांधवांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ व मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
याबाबत निवेदनाद्वारे केलेली मागणी अशी, मुस्लिम समाजासाठी ईद ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची पर्वणी असून रमजान ईद प्रमाणे यास घेतला अनन्यसाधारण महत्त्व आहे या उपलक्ष्याने, आम्ही आपल्याला विनंती करतो की ईद निमित्त ईदगाह परिसरात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
साधारणपणे, ईदच्या दिवशी मुस्लिम समाजाने विविध धार्मिक कार्ये, नमाज आणि अन्य कार्यक्रम आयोजित केले जातात. यासाठी स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था तसेच सुरक्षा या सर्व बाबींची योग्य आणि योग्यरित्या व्यवस्था करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही या सर्व बाबींचा विचार करून त्यानुसार आवश्यक त्या सुविधांची व्यवस्था करावी अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा