Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ मे, २०२६

करमाळा भगवान महावीर नगर मधील वादळीवा-याने उन्मळून पडलेले झाड अन् टांगती तलवार. धोक्याची घंटा...?

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*




करमाळा शहरातील जेऊर रोडवरीलम भगवान महावीर उद्यानासमोर असलेले झाड गेल्या दहा-बारा दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जमिनीतून मुळासह उन्मळून  जमिनीवर न कोसळता दुसऱ्या झाडाच्या फांद्यामुळे लटकत राहिलेले आहे. 

     शेजारी अनेक झाडे असल्याने व सध्या तीव्र उन्हाळा असल्याने उष्णते पासून बचाव करण्यासाठी झाडाच्या आश्रयाला सावली हुडकत दुपारच्या वेळेला शेजारीच असलेल्या बाकड्यावर आपल्या जीवाची कसलीही परवा न करता एक गृहस्थ दुपारी उन्हापासून बचाव करण्यासाठी झोपलेले दिसून आले. 

      दहा-बारा दिवसापूर्वी वादळी वाऱ्याने उन्मळून पडलेले झाड कधी जमिनीवर कोसळले याचा नेम नाही. रहदारीच्या मार्गावर असलेले धोकादायक झाडाकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा