उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45,न्युज मराठी
बारामती साहित्यकट्टा व पुस्तक प्रकाशन सोहळा शनिवार दि.16 मे रोजी उत्साहात पार पडला. यावेळी मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते कवयित्री कु. सन्मती राहुल घुले हिच्या 'फुले मनातील' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी श्री. दिलीप जगताप साहेब ,आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती दौंड, व सोपान काकडे महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर कवयित्रीचेही मनोगत झाले.
तिच्या वयाच्या 17 व्या वर्षी 'फुले मनातील' हा काव्यसंग्रह प्रकाशित होताना सगळ्यांनाच आनंद होत होता .सर्वांनी तिला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. या कार्यक्रमासाठी बरीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी उपस्थित होते.
नंतर प्रमुख पाहुणे डॉ.दीपक पवार यांच्याशी संवाद व प्रश्न उत्तरे झाली. श्री शशांक मोहिते सर व विनोद खटके सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व दिनेश अदलिंग सरांनी उपस्थित यांचे आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा