Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ मे, २०२६

नरसिंहपूर येथे विश्वकल्याणार्थ अश्व त्रिरात्र महासोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



----- अश्व त्रिरात्र महासोमयाग सेवा समिती नरसिंहपूरच्या वतीने "विश्वकल्याणार्थ अश्व त्रिरात्र सोमयागाचे" आयोजन दि. २५ मेते १ जून दरम्यान वसंत (आंबा) नामदेव घाडगे मळ्यात करण्यात आला असल्याचे सौ. भाग्यश्री व श्रीकांत रामचंद्र दंडवते यांनी सांगितले.

    यज्ञ-अनुष्ठानरत परिवार 'सदगुरू सेलुकर परिवार' महाराष्ट्राने भारताला दिला आहे. शंभर वर्षांपूर्वी श्रीकृष्ण सेलूकर महाराजांनी अग्निहोत्र दीक्षा घेऊन सोमयाग केले त्यानंतर त्यांची सुपुत्र रंगनाथ महाराज शेलुकारांनी अनेक सोमयाग करून सतत एक वर्ष चालणारा 'गवामयन सत्र सोमयाग' केला. त्यानंतर त्यांची सुपुत्र दीक्षित यज्ञेश्वर जी शेलूकर यांनी मागील २३ वर्षात ३२ सोमयाग भारताच्या विविध शेती संपन्न केले, तर श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर(अधिक मासात) येथील ३३ वा सोमयाग संपन्न करीत आहेत.

    दीक्षित यज्ञेश्वरजी सेलुकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणाऱ्या भव्य दिव्य यज्ञ सोहळ्यास दैनंदिन नित्य यज्ञीय कार्यक्रमासहित अनेक मान्यवर दिगजांचे कीर्तन, प्रवचन, भजन, प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. महा सोमय्या गावातील प्रक्रियेचे प्रसादिक समालोचन सुद्धा ऐकावयास मिळणार आहे. यज्ञ कार्यक्रमांमध्ये प्रतिदिन सामूहिक श्री सूक्त हवन होणार आहे सर्व भक्तांनी भाग घ्यावा सूर्योदयापासून ते रात्रीच्या पहिल्या प्रहार पर्यंत चालणाऱ्या अभूतपूर्व, महन्मंगल, ऐतिहासिक विश्वकल्याणकारी सोहळ्यात तन मन धनाने सहकार्य करून यज्ञदर्शन प्रबोधन तथा अन्नप्रसादाचा लाभ घेऊन धर्म जागरणाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन दिक्षित यज्ञेश्वर महाराज व श्रीकांत दंडवते यांनी केले आहे.

    नरसिंहपूर येथील चैतन्य महाविद्यालय समोर वसंत नामदेव घाडगे यांच्या मळ्यात दोन एकर क्षेत्रावर दिड एकर भव्य दिव्य शामियाना उभारण्यात येत आहे. सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. तसेच अध्वर्यू वे.मू.मंगेश कुलकर्णी बावीकर, उध्दाता वे.मु.तुकाराम मुळे, ब्रम्हा वे.मू. अनिरूध्द हिस्वनकर, होता वे.मू.गणेश वैद्य उपस्थित संपन्न होणार आहे. यामध्ये सामुहिक श्रीसुक्त हवन सायंकाळी ५ ते ६ वेळेत सर्व धर्मियांना सहभागी होता येणार आहे.

फोटो - नरसिंहपूर येथे विश्वकल्याणार्थ अश्व त्रिरात्र महासोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा