*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख असून कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले हे ऐतिहासिक शहर हिंदुत्वाच्या विचारांची परंपरा जपणारे आहे. या पवित्र भूमीत आयोजित करण्यात आलेल्या लघुकुंभमेळ्यामुळे वाई नगरी अधिक पावन झाल्याची भावना मंत्री गोरे यांनी व्यक्त केली. वाईच्या कुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार असल्याचे उद्गार ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी वाईच्या लघुकुंभ मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले. २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी तयारी करत असल्याचे सांगितले. यावेळी गुजरातहून आलेले परमपूज्य महंत महादेवगिरी महाराज, योगेन्द्र्गिरी महाराज, नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, युवा नेते विराज शिंदे पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड उपनगराध्यक्ष घनशाम चक्के, विरोधी पक्ष नेते विजय ढेकाणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन घाटगे, मंदीर महासंघ तालुकाध्यक्ष श्रीधर भाडळकर, राजेंद्र पुजारी कृष्णा नदी सेवा समितीचे सदस्य काशिनाथ शेलार, सचिन सावंत, निलेश मोरे, प्रवीण जाधव निखिल जाधव संतोष जमदाडे,संग्राम पाडळे सर्व नगरसेवक, नगरसेविका, वाईकर नागरिक, सर्व साधुसंत, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री ना. गोरे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी आयोजक, साधूसंत, नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक, नगरसेविका तसेच सर्व कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांच्या या परिश्रमामुळे हा सोहळा यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या भव्य कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक देशभरातून येणार असून त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन विविध सुविधा उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी गुजरात अटल धामचे महंत महादेवगिरीजी महाराज म्हणाले, अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते व हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळते,” या कुंभ मेळ्यामुळे वाई तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी मुख्य आखाड्याच्या वतीने ना.जयकुमार गोरे व नगराध्यक्ष अनिल सावंत यांचे स्वागत करण्यात आले. तसेच वाईच्या वतीने नगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी येणाऱ्या सर्व साधुसंतांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला फीत कापून व शंकराच्या व महागणपती च्या प्रतिमांचे पूजन करून लघुकुंभ मेळ्याचा शुभारंभ करण्यात आला. आयोजकांच्या वतीने शब्द सुमनानी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. सकाळी आकरा वाजेपासून संताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच आज पहिल्या दिवशी दीडशे साधुनी उपस्थिती दर्शविली. उपस्थित साधूसंत, महंत, नागरिक, पदाधिकारी व आयोजकांचे आभार मानले तसेच वाईकरांनी या पवित्र उपक्रमात मोठ्या उपस्थित राहून लाभ घ्यावा असेही आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा