Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ मे, २०२६

*करमाळा मतदार संघासाठी चार ठिकाणी नवीन उपवीजकेंद्र उभारण्यात येणार तर चार ठिकाणी क्षमतावाढ करणार... आमदार नारायण आबा पाटील*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा मतदार संघातील वीजपुरवठा अधिक बळकट करण्यासाठी करमाळा तालूक्यात ३३/११ केव्हीए क्षमतेचे चार नवीन सबस्टेशन उभारण्यात येणार आहेत तर चार जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढ करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली.

 याबाबत अधिक सविस्तर बोलताना आमदार पाटील म्हणाले की करमाळा मतदार संघातील निमगाव, सौंदे, वडशिवणे आणि ढोकरी या ठिकाणी ३३/११ केव्हीए क्षमतेच्या नवीन सबस्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. तर जातेगाव व आवाटी या करमाळा तालुक्यातील जुन्या सबस्टेशनमध्ये तसेच माढा tab तालुक्यातील कुर्डू व बारलोणी या सबस्टेशनमध्ये पाच एम व्ही ए क्षमतेचे नवीन ट्रान्सफार्मर बसवून तेथील क्षमतावाढ करण्यात येणार आहे. यापैकी निमगाव (टे), सौंदे व वडशिवणे येथीन नवीन सबस्टेशनची उभारणी ही एडीबी योजनेतुन करण्यात येणार आहे. तसेच ढोकरी येथील सबस्टेशनची उभारणी ही आर डी एस एस या योजनेतुन करण्यात येईल. मंजुर असलेले चार अतिरिक्त पाच एमव्हीए क्षमतेचे नवीन ट्रान्सफार्मर हे सुद्धा एबीडी योजनेतुन बसविण्यात येणार आहेत.

 ३३/११ केव्हीए क्षमतेच्या नवीन मंजूर सबस्टेशन पैकी ढोकरी व वडशिवणे या ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. नवीन जागा हवी असल्याबाबत महावितरण कडूनही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी आपला पाठपुरावा चालू असुन करमाळा मतदार संघातील नव्याने ओलीताखाली आलेले क्षेत्र लक्षात घेतल्यास वीज मागणी व प्रत्यक्षातील विज पुरवठा यातील फरक भरुन काढून शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने व अखंडीत वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा