Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ मे, २०२६

*तुळजापूर–उंडरगाव मार्गे लोहारा एसटी सेवा बंद;* *मतदार प्रवासी आणि नागरिकांची दिशाभूल तर नव्हती?*

 *लोहारा--- प्रतिनिधी* 

*यशवंत  भुसारे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


तुळजापूर ते तोरंबा– उंडरगाव, मार्डी मार्गे लोहारा धावणारी एसटी बस सेवा अचानक बंद झाल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली ही सेवा निवडणूक संपताच ठप्प झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नवीन सुरू झालेल्या या मार्गावरील एसटी बसचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले होते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत नियमित धावणारी बस प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरली होती. मात्र, निवडणुका संपताच बसची अनियमितता सुरू झाली-कधी वेळेवर, कधी उशिरा, तर कधी येतच नसल्याने प्रवाशी वर्गांना या गाडीचा ताळमेळ लागेना.त्यात गेल्या आठ दिवसांपासून ही सेवा पूर्णपणे बंद असल्याने तालुक्याला ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यां पासून ते जेष्ठ वयोवृद्ध पर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसत आहे. “ही सेवा केवळ निवडणुकी पुरतीच मर्यादित होती का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.प्रवासी वर्गाने प्रशासनाकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत तुळजापूर, तोरंबा–उंडरगाव, मार्डी मार्गे लोहारा एसटी बस तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी ही सेवा जीवनवाहिनी ठरत असल्याने प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सेवा पुन्हा नियमित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असुन राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक याकडे लक्ष देतील का अशी प्रवाशी वर्गांची अपेक्षा आहे.


                -----: चौकट:-----

       प्रतिक्रिया 

तुळजापूर आगाराची एसटी बस तुळजापूर तोरंबा उंडरगाव मार्डी मार्गे लोहारा नव्याने गाडी चालू केली होती परंतु त्या गाडीला उत्पन्न मिळत नसल्याने हि गाडी बंद करण्यात आल्याची माहिती तुळजापूर आगार प्रमुखांनी दैनिक जनमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले 

     शिंदे साहेब 

आगारप्रमुख तुळजापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा