पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९
सन २०१८ पूर्वीच्या सेवानिवृत्त शिक्षकांची कपात झालेली संगणक रक्कम परत मिळावी, ६५ वर्षे वयास पाच टक्के पेन्शन वाढ व्हावी, दरमहाची पेन्शन जिल्हा परिषद कार्यालयातून व्हावी,
अति उत्कष्ट कामाची आगावू वेतन वाढ मिळावी, जुलै वेतन वाढीनंतर सहा महिने सेवा असल्यास एक वेतन वाढ कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मिळावी, पेन्शन विक्रीची कपात रक्कम १५ वर्षे ऐवजी बारा वर्षे करावी या प्रमुख मागण्यांसह आगामी संकल्पित मेळाव्यात उपस्थित रहावे तसेच आमचा घरचा सत्कार स्वीकारावा यासाठी अहिल्यानगर सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्य विधानपरिषदेचे अध्यक्ष नामदार राम शिंदे यांची चौंडी ( ता. जामखेड जिल्हा अहिल्यानगर ) येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना आपल्या उपरोक्त मागण्यांचे निवेदन देवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
दिनांक १० मे रोजी झालेल्या या सकारात्मक भेट तसेच चर्चेमुळे अहिल्यानगर सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ भारावून गेले.
सदर कार्यक्रमास नव निर्वाचित आमदार अक्षय कर्डिले, विवेक कोल्हे, नागपूर विद्यापीठावर निवड झालेले राजेश पर्जने, सहकार, शिक्षण क्षेत्रा तील मान्यवरांचा तसेच सेवानिवृत्त कर्मचारी मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे देखील आयोजन करण्यात आल्याचे नामदार श्री. शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे सूतोवाच शिष्टमंडळाने केले. यावेळी मेळाव्यामध्ये सेवानिवृत्तांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्या साठी चर्चा करावयाची आहे अशी भावनिक साद विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांना घालण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळाचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राम शिंदे यांनी दिनांक २० ते २५ जून दरम्यान मेळाव्यास मी प्रत्यक्ष उपस्थित राहील असे आश्वासन दिले. त्यामुळे नामदार राम शिंदे सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या मेळाव्यास निश्चित उपस्थित राहणार असल्याने संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते संकल्पित मेळाव्याच्या जोरदार तयारीस लागले आहेत. अहिल्यानगर पेंशनर शिक्षक संघटनेचे सरचिटणीस ब. द. उबाळे, दक्षिण विभाग प्रमुख ज्ञा. नि. थोरात, जामखेड तालुका अध्यक्ष डॉ. संजय गीते, सरचिटणीस अंकुश ओमासे, श्रीगोंदा शिक्षक संघटनेचे सरचिटणीस बा. सा. साबळे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष मुकूंद महारनवर, विकास मंडळ नगर चे अध्यक्ष
सो. मा. जगताप, कर्जत तालुका अध्यक्ष महादेव गांगर्डे या शिष्टमंडळाने नामदार राम शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले, निवेदन देवून त्यांच्याशी सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. सदर मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन अहिल्यानगर से. नि. संघटनेचे भिष्म पितामह द .मा. ठुबे यांनी केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा