Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १३ मे, २०२६

*अकलूजच्या फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मायलान लॅबोरेटरीज लिमिटेड बेंगलोर येथे निवड.*

 *अकलूज-- प्रतिनिधी* 

 *केदार लोहकरे* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या सहा विद्यार्थ्यांची मायलान लॅबोरेटरीज लिमिटेड, बेंगलोर येथे निवड झालेली आहे. सोलापूर येथे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ऑफ कॅम्पस पुल ड्राईव्हमध्ये अंतिम वर्ष बी. फार्मसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.यामध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्ष बी.फार्मसीचे विद्यार्थी शहानवाज मुलाणी,ऐश्वर्या कुलकर्णी,आर्यन घाडगे,दीप ननवरे,साक्षी देशमुखे,इरफान सय्यद आदी विद्यार्थ्यांची मायलान लॅबोरेटरीज लिमिटेड बेंगलोर येथे निवड झाली आहे. 

         मायलान लॅबोरेटरीज लिमिटेड बेंगळूर या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीकडून विद्यार्थी निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली होती.मायलान लॅबोरेटरीज लिमिटेड बेंगलोरमध्ये स्टराइल फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्सची उत्पादने घेतली जातात.विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया अप्टीट्यूड टेस्ट, टेक्निकल राऊंड,एच.आर.राउंड अशा वेगवगळ्या परीक्षांमधून पार पडली.मायलान लॅबोरेटरीज लिमिटेड बेंगळूरमधील निवड समिती टेक्निकल प्रतिनिधी म्हणून एन.रवी,जे.नवीन कुमार,दिनेश कुमार तसेच एच.आर.प्रतिनिधी जी.के.नितीन,संतोष कुमार आणि कीर्ती कैथवास यांनी काम पाहिले. महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ.मुकुंद गाडे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. 

            या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील,मार्गदर्शक संचालिका कु.स्वरुपाराणी  मोहिते-पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  महाविद्यालय विकास समितीचे सभापती विनोदकुमार दोशी तसेच सदस्य नारायण फुले,रामचंद्र गायकवाड,योगेश गांधी व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा