Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ मे, २०२६

*दिड वर्षात कुकडी व दहिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपये मिळवून दिले...  : आमदार नारायण आबा पाटील*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना व कुकडी प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी दिल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आपण भुभाडे, अंतिम निवाडा, भुसंपादन आणि पिक नुकसान भरपाईपोटी आता पर्यंत ३२ कोटी २ लक्ष १५ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात यशस्वी ठरलो असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक सविस्तरपणे माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडी प्रकल्पासाठी आपल्या जमीनीवर चारी खोदकाम करुन दिले परंतु प्रत्यक्षात त्यांना भुभाडे अथवा भुसपादनाचे पैसे दिले गेले नव्हते. सन २०१४ ते २०१९ या माझ्या पहिल्या टर्म मध्ये हि बाब आपण अधिवेशनात मांडली व यानंतर सदर‌ पाच वर्षात भुभाडे पोटी शेतकऱ्यांना आर्थिक रक्कम देण्यास सुरुवात झाली. आता आपण आमदार पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सन २०२४-२५ या वर्षात कुकडी भुभाडे व संपादन पोटी १९ कोटी ३६ लाख रुपये तर सन २०२५-२६ या वर्षात १० कोटी ४६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. तर दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पीडीएन क्षेत्रातील पिकांकरीता, पिक नुकसान भरपाईपोटी व बंदिस्त नलिका वितरण प्रणाली भुभाडे यापोटी 2024-25 रु.49 लक्ष

(कुंभेज,गुळसडी, निंभोरे, शेलगाव ( क ),घोटी, सौंदे, सालसे) तर 2024-25 रु 30 लक्ष नुकसान भरपाई म्हणून पीडीएन क्षेत्रातील पिका करिता 

(सौंदे, सरपडोह, वरकटणे, सालसे, घोटी ,मलवडी) तसेच 2025-26 रु.107 लक्ष साडे गाव अंतिम निवाडा कामी ॲडव्हान्स व 2025-26 मध्ये मौजे निंभोरे करीता  रु.17 लक्ष खरेदीसाठी रक्कम वितरीत करण्यात आली.2025-26 मध्ये मौजे सौंदे पीक नुकसानभरपाई तसेच बंदिस्त नलिका वितरण प्रणाली भुभाडे म्हणून रुपये १७ लक्ष १५ हजार देण्यात आले आहेत. तसेच उर्वरित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा जमिनीचे भाडे, मोबदला, पिक नुकसान भरपाई या वर्गात समाविष्ट असलेल्या बाबी प्रमाणे रक्कम दिली जाणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा