*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- मौजे बोराटवाडी (ता.इंदापूर) येथे कृषी विभागामार्फत खरीप हंगाम मोहीम २०२६-२७ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बोराटवाडी येथील कार्यक्रमात खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना उप कृषी अधिकारी गोरखनाथ रामगुडे यांनी विविध कृषी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. हुमणी नियंत्रणासाठी कृषी सेवक श्रीमती के. जी. अभंग यांनी प्रकाश सापळे उभारणी व त्याचे महत्त्व विशद केले. बोराटवाडीच्या सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती अंजली अडसुळ यांनी उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, तसेच आधुनिक शेतीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या CHC सेंटरविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले.
सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळजन्य परिस्थितीत फळबागांचे संरक्षण, सूक्ष्म सिंचनाचा वापर, पाणी व्यवस्थापन, आच्छादन तंत्रज्ञान तसेच उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सखोल माहिती देण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान विविध विषयांवरील प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.
कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी सौ. राणी खर्डे, उप कृषी अधिकारी गोरखनाथ रामगुडे आदिसह महिला उपस्थित होत्या.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी उपयुक्त तांत्रिक माहिती मिळाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
फोटो - मौजे बोराटवाडी येथे खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध कृषी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
---------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा