*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
- श्री लक्ष्मी नृसिंह जयंती व नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अकरा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंकूश महाराज रणखांबे यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दरम्यानच्या काळात दररोज सकाळी सनई चौघडा वादन, विष्णुसहस्त्रनाम, पंचामृत, विविध जिल्ह्यातून आलेल्या भजनी मंडळ, प्रवचन, नादब्रह्म, भक्ती संगीत, कीर्तन, अभंगवाणी, सुगम भक्ती संगीत, भावगंध संगीत, शहनाई वादन, रंगसप्तक, कुचीपुडी नृत्य आदि भक्तीमय सेवा सादर केली. तर नृसिंह जयंती दिवशी समर्थभक्त राघवेंद्र देशपांडे (डोंबवली) यांचा बहारदार कीर्तनाचा कार्यक्रम सादर झाला.
तसेच देवस्थानच्या वतीने आरोग्य व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डोळे व दंत चिकीत्सा करण्यात आली. तसेच शिबीरात मोफत चष्मांचे वाटप करण्यात आले. भाविक व ग्रामस्थांच्या वतीने श्रींची पालखी मिरवणूक गावातून विविध पारंपरिक वाद्य, लेझीम व रंगीबेरंगी फटाक्यांची अताषबाजी, पारंपारिक खेळ लाठीकाठी व विविध खेळांनी मिरवणूक पार पडली. तर ह.भ.प.अंकुश सुखदेव रणखांवे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून लक्ष्मी-नृसिंह मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. नवरात्र उत्सव शांततेत पार पडला.
नवरात्र उत्सव पार पाडण्यासाठी श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त व विश्वस्त मंडळ, सर्व ब्रह्मवृंद, देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
फोटो - नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात अंकूश रणखांबे महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा