*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील आवाटी येथील रहिवासी तसेच रिजवान मकबूल शेख यांची मुलगी जेबा रिजवान शेख हिने BCA(कॉम्प्युटर सायन्स )ची पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून महाराष्ट्र शासना तर्फे घेण्यात येणारी MCA CET परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिने 83.31% गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.
कुमारी जेबा शेख यांचे प्राथमिक शिक्षण आवाटी येथील जिल्हा परिषदेमध्ये झाले तर विद्यालयीन शिक्षण परंडा येथे तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी होऊन पदवी पर्यंतचे शिक्षण परंडा येथील शिंदे महाविद्यालयामध्ये झाले होते याशिवाय सेट परीक्षा तिने धाराशिव येथून पूर्ण केले होते या सेट परीक्षेमध्ये तिने कोणाचेही मार्गदर्शन न घेता स्वतःच्या हिमतीवर अभ्यासामध्ये नियमित सातत्य ठेवून त्याने सदरचे शिक्षण पूर्ण केले कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता कुमारी जेबा शेख हिने सदरचे यश संपादन केले आहे आवाटी येथील मुस्लिम समाजा मधून प्रथमताच एका विद्यार्थिनीने सदरचे घवघवीत यश मिळवल्याबद्दल तिचे विशेषता मुस्लिम समाजा मधून अभिनंदन होत आहे आपण भविष्यात पुढील उच्च शिक्षण पूर्ण करून माझ्या गावाचे तसेच नातलगाचे नावलौकिक करणार असल्याचे त्याने बोलताना सांगितले
तिच्या या यशाबद्दल आवाटी ग्रामपंचायतीचे सरपंच परवीन इमरान खान यांच्यातर्फे तिचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच तनवीर शेख,राजू खान (सोसायटी चेअरमन), ग्रामसेवक कुलदीप दौंड व इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. वली बाबा दर्गाचे पुजारी इरफान कादरी व आवाटी गावचे उपसरपंच तनवीर शेख, एडवोकेट वसीम शेख यांची ती पुतणी आहे. तिच्या या यशाबद्दल आवाटी येथील वली बाबा दर्गाहचे खादीम गुलाम नबी कादरी तसेच इरफान कात्री यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा