*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा शहराच्या माजी उपनगराध्यक्षा श्रीमती सुमित्राअक्का बाळासाहेब घोलप (वय ) यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवारी (ता.१३) सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने करमाळा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नितीन घोलप, संतोष घोलप व विजय घोलप यांच्या त्या मातोश्री होत. तसेच नगरपालिकेच्या बांधकाम समितीच्या चेअरमन सौ. लता विजय घोलप यांच्या त्या सासूबाई होत.
श्रीमती घोलप यांनी नगरसेविका तसेच उपनगराध्यक्षा म्हणून कार्य करताना शहराच्या विकासासाठी योगदान दिले. धार्मिक वृत्ती, मायाळू स्वभाव आणि दयाळूपणा यामुळे त्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे त्या अनेकांच्या आदराच्या होत्या. त्यांच्यावर उद्या गुरूवार (ता.१४) रोजी सकाळी ९ वाजता दत्त मंदिर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा