पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
अधिक महिन्याचे औचित्य साधत जेष्ठ पौर्णिमा उत्सवानिमित्त पुणे दत्तनगर येथील आनंद दरबार मध्ये रविवार दिनांक ३१ मे रोजी सकाळी नऊ ते साडे दहा या कालावधीत भक्तांबर पठणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी दिली.
या कार्यक्रमात ५१ जोडपी भक्तांबर पठण करणार असून हा विशेष धार्मिक कार्यक्रम प्रखर वक्ता प.पू. हिमानीजी म. सा., प.पू. हिमांशीजी म. सा. तसेच प.पू. रविकाश्री म. सा. यांचे आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी गौतम प्रसादी ( धोंडे जेवण ) चि. उत्सव कौषभजी धोका व सौ. स्मिता विलासजी कोटेचा या भाग्यवान यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रभावना भाग्यशाली सौ. राजकुंवर देवेंद्रकुमार धोका, मनोज मुकेश छाजेड व विआन सूरज पारख असून या कार्यक्रमात सहभागी होऊन धर्मलाभ घेण्यासाठी दिलीप संचेती, विलास कोटेचा, प्रमोद रांका ( मो. ९८९०३५३०१२) तसेच सुभाष लुणावत ( मो. ८३९०२३१३५५ ) यांच्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
या धार्मिक कार्यक्रमासाठी समाजातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन शेवटी अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा