Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ मे, २०२६

प्रॅक्टिकल एज्युस्किल्स आणि टी. जे. कॉलेज यांच्यात सामंजस्य करार, रोजगाराभिमुख क्रांतिकारी पदवी अभ्यासक्रमांना प्रारंभ.

 *पुणे, डॉ. संदेश शहा.सहसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो. ९९२२४१९१५९*


विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत उद्योगाभिमुख कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने प्रॅक्टिकल एज्युस्किल्स आणि टी. जे. कॉलेज यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार ( एमओयू ) करण्यात आला. या कराराअंतर्गत ‘कमवा -शिका’ तत्त्वावर आधारित एईडीपी म्हणजेच अप्रेंटिशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम   राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत उद्योगातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी देखील उपलब्ध होणार आहे.

खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी टी. जे. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्रॅक्टिकल एज्युस्किल्सचे संस्थापक सन्मित शाह,  प्रॅक्टिकल एज्युस्किल्स अभ्यासक्रम विभागातर्फे निलेश देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते.”

उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये :

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासोबत उद्योगात प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. लर्न व्हाईल यू अर्न‘ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी देणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०  लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली असून ते पूर्णतः रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित आहेत.

सुरू होणारे नवीन अभ्यासक्रम :

या उपक्रमाअंतर्गत पुढील पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत :

वाणिज्य शाखा :

अकाउंटिंग अँड बिझनेस प्रॅक्टिसेस

टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी.

शास्त्र शाखा : ए आय

अँड बिझनेस ऑटोमेशन.

यावेळी कार्यक्रमाचे तसेच संस्थेचे अध्यक्ष 

कृष्णकुमार गोयल म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी नव्हे तर उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये आणि योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासू बनविण्यास निश्चितच मदत करेल.”

प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, “ या मॉडेलमुळे विद्यार्थी शिक्षण पूर्ण होण्या पूर्वीच उद्योगसज्ज होतील. स्टायपेंडच्या माध्यमातून त्यांना आर्थिक आत्मनिर्भरतेचाही अनुभव मिळेल.”

प्रॅक्टिकल एज्युस्किल्सचे संस्थापक सन्मित शाह म्हणाले “उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देऊन उज्ज्वल करिअरच्या दिशेने मार्गदर्शन करेल.”

यावेळी निलेश देशपांडे यांनी अभ्यासक्रमांची रचना, प्रशिक्षण पद्धती आणि उद्योगसहभाग याविषयी सविस्तर माहिती दिली. 

या अभिनव उपक्रमा मुळे खडकी आणि कॉलेज रोड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती महाविद्यालयाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

फोटोमध्ये डावीकडून  सामंजस्य करार करताना सन्मित शाह, कृष्णकुमार गोयल. प्राचार्य डॉ. संजय चाकणे, निलेश देशपांडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा