*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
दिनांक 5 जून 2026 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध प्रकारे साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून करमाळा नगर परिषदेने यावर्षी शहरात पाच हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे उद्यान प्रमुख अश्विनी जाधव यांनी माहिती दिली .क.न.प.च्या महावीर उद्यान येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी पाणीपुरवठा अभियंता शितल बहाड,सुप्रिया पालखे, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी आरोग्य निरीक्षक विपुल पुजारी सोमनाथ सरवदे,हिंदुराव जगताप,सचिन घाटोळे, गणेश शिंदे, संकल्प शहाणे, सोहेल दारुवाले ,संजय जगताप, पियुष शिंपी, विक्रम कांबळे ,तुषार टांकसाळे,प्रदीप चौकटे ,गणेश फलके ,चिंटू कांबळे, मयूर लालबेग, बद्रीनाथ गायकवाड ,व विविध विभागाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात वनीकरणाच्या संकल्पनेतून दोन ते तीन फूट अंतरावर सुमारे दोन ते तीन हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला यामध्ये बकुळ, करंज, अर्जुन, कडुलिंब, पिंपळ, वड आणि ताम्हण यासारख्या देशी वृक्षांचा समावेश करण्यात येत आहे. या वृक्षांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली .यावेळी वृक्षरोपणा बरोबरच वृक्ष संवर्धनाचे तितकेच महत्व असल्याचे सांगितले पर्यावरण संरक्षणासाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमात महावीर उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबवून उद्यानातील परिसर स्वच्छ करण्यात आला .तसेच प्लास्टिक गोळा करण्यात आले स्वच्छता राखा ,झाडे लावा, झाडे जगवा ,कापडी पिशवीचा वापर करा पर्यावरण वाचवा स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी आहे अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येकास कापडी पिशवी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा