इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडी गावचे सुपुत्र चि.स्वरूप भरत भुजबळ याची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस सब इन्स्पेक्टर पदी निवड झाली. त्यानंतर त्याने नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रातून यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. यावेळी आयोजित केलेल्या नूतन अधिकाऱ्यांच्या दीक्षांत समारंभात त्याने उत्कृष्ट संचलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो इंदापूरच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथे क्रीडा संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ.भरत भुजबळ यांचा चिरंजीव आहे.
स्वरूप याने धैर्य डोळ्यासमोर ठेऊन लहानपनापासून स्पर्धा परीक्षांची तयार करत यश संपादन केले. पी एसआय पदी निवड झाल्यानंतर यशस्वीरित्या प्रशिक्षण देखील पूर्ण केले. त्याबद्दल इंदापूर तालुक्यातील विविध क्षेत्रातून त्याचे कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे शिरसटवाडी ग्रामस्थ, नातेवाईक यांनी दीक्षांत सोहळ्यात उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.
त्याने अल्पावधीत केलेल्या या दैदिप्यमान यशाने युवा पिढीला प्रेरणा निर्माण झाली.
यानिमित्त स्वरूप म्हणाले, ग्रामीण भागात खूप गुणवत्ता आहे. जिद्द, आत्मविश्वास तसेच मेहनत या जोरावर युवापिढी आपले जीवन यशस्वी करू शकते. देश सेवा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा