Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जून, २०२६

आंबेगांव पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी, चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी चेनस्नॅचिंग करणारे दोन आरोपी गजाळ करून २,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ज प्त

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी गजाआड करून  २,४०,००० रुपये किमती चा मुद्देमाल जप्त उत्कृष्ट करण्याची कामगिरी आंबेगांव पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी, आंबेगाव पोलीस स्टेशन ने केली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की

दिनांक १३/०५/२०२६ रोजी रात्री ०९/३० वा. सुमारास आंबेगांव रोडने दत्तनगर येथून फिर्यादी त्यांच्या घराचे दिशेने पायी चालत जात असताना त्यांचे समोरुन दत्तनगर चौकाकडुन रस्त्याने एका काळ्या रंगाची दुचाकी मोटार सायकलवरुन दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या जवळ जावून त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरी करून पळून गेले. त्यामुळे फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने आंबेगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २०९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने आंबेगांव पोलीस स्टेशनडकील तपास पथकाने तब्चल २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर सदरचे आरोपी हे सासवड परिसरात असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाचे अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते व प्रमोद भोसले यांना मिळाल्याने मा. वपोनि शरद झिने यांच्या आदेशान्वये आंबेगांव पोलीस ठाणेकडील पोलीस उप-निरीक्षक, युवराज शिंदे व तपास पथकाचे अंमलदार असे सदर ठिकाणी जावून आरोपीचा कसोशीने शोध घेवून त्यांना शिताफीने पकडले. त्यांना त्यांचा नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) रोहित राजु माने वय-२० वर्षे काम काहीनाही सध्या रा. मु.पो. खंडोबानगर झोपडपट्टी, सासवड पुणे यापुर्वी रा बाचर प्लॉटींगजवळ, दत्तमंदिरमागे, खोपडेनगर, भारतनगर, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज पुणे २) ओमकार विकास नाईक वय २२ वर्षे रा. लक्ष्मी वजन काट्याजवळ, नवीन सकाळ प्रेसच्या शेजारी, संभाजीनगर, बडकी पुणे अशी असल्याचे सांगितल्याने व त्यांनी गुन्हा केला असल्याबाचत उपयुक्त माहिती दिल्याने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आंबेगांव पोलीस स्टेशन येथे आणून त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी व १० ग्रॅम सोने असा एकूण २,४०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संजय दराडे, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. श्री. मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरिश गायकवाड, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, शिवाजी पाटोळे, फिरोज शेख, अजय कामठे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, राकेश टेकवडे अवधूत जमदाडे यांच्या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा