उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित, दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे सोमवारी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव व मोफत पुस्तक वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्व आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट, रंगीबेरंगी रांगोळी,स्वागताचे फलक व देशभक्तीपर गीतांमुळे प्रशालेत आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.नवीन विद्यार्थ्यांचे हातात फुगे देवून पुष्पवर्षावात स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्सुकता सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे हे होते. प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास एज्युकेशन सोसायटीचे माजी व्हा.चेअरमन नितीन इनामके,माजी संचालक अनिल रासकर,प्रकाश गिरमे,दिलीप इनामके पृथ्वीराज भोंगळे तसेच पालक अरविंद चव्हाण, मिनानाथ मांडवे,महिला पालक ऐश्वर्या काळे आदी महिला व पुरुष पालक उपस्थित होते.यावेळी सर्वांचे हस्ते नवीन विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.सर्व उपस्थित इ. ५ वी ते १२ वी पर्यंतच्या जवळपास १२०० विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून माळीनगर साखर कारखाना,एज्युकेशन सोसायटी, म.फुले पतसंस्था,माळीनगर मल्टिस्टेट यांचे वतीने बिस्कीट पुडे देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व नवागतांचे प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते व्यासपीठापर्यंत " सासो की सरगम गाये सुस्वागतम" या हिंदी गीतावर फुलांच्या पाकळ्यांनी व टाळ्यांच्या गजरात पालकांसमवेत सर्व विद्यार्थी तसेच व्यासपीठावरील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे, सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. शाळेच्या पहिला दिवसाचे निमित्ताने प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे मध्यान भोजन देण्यात आले. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रशालेच्या भव्य मैदानावर मोठ्या स्वरूपात साजरा केला जाणार असल्याचे योग शिक्षक बाळासाहेब
सोनवणे यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले तर आभार उपप्राचार्य रितेश पांढरे यांनी मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा