*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
नाशिक, दि. ज्येष्ठ कवी तथा सेवानिवृत्त कलाशिक्षक डी. डी. पाटील (भोसले) यांच्या 'शब्द फुलोरा' या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आदित्य हॉल, गुरुगोविंदसिंग स्कूलसमोर, इंदिरानगर, पाथर्डी रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोग, प्रसूतीतज्ञ, साहित्यिक डॉ. रविंद्र शिवदे हे राहणार असून, ज्येष्ठ कवी व साहित्यिक लक्ष्मण महाडीक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कवितासंग्रहासाठी प्रस्तावना व पाठराखण चित्रपट गीतकार/ कवी व लेखक सोमनाथ पगार यांनी लिहली असून, कार्यक्रमात ते आपले मनोगत व्यक्त करणार आहे.
कार्यक्रमास साहित्यिक व प्रकाशक संदीप देशपांडे, संगीतकार व गायक संजय गीते, ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र (भैयासाहेब) भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी जनार्दन देवरे करणार आहे.
निसर्ग, माणुसकी, सामाजिक जाणीवा, संस्कार आणि जीवनमूल्यांचा वेध घेणाऱ्या या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, कवी, लेखक, रसिक नागरिक तसेच सर्व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा