*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज पहाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंदापूर येथे सकाळी ५.३० वाजता तसेच चेतना प्रांगण महाविद्यालय, सरडेवाडी येथे सकाळी ७.३० वाजता योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
या योग दिन कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानसाधना करून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.
योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमात भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखरजी वडने, प्रदीपजी गारटकर, प्रवीणजी माने, उदय देशपांडे, किरण गाणबोटे, राम आसबे, आप्पासाहेब माने, विलास भोसले, मयूर शिंदे, प्रेमकुमार जगताप, लखन जगताप, सचिन शिरसट, सुनील खाडे, नवनाथ शिंदे, ज्योतीराम कुर्डे, राजेश अवचर आणि सागर आसबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी योग प्रशिक्षक प्रशांत गिड्डे, बाळासाहेब शिंदे, हनुमंत यादव, अजिनाथ दळवी आणि सौ. अश्विनी गोळे यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान पद्धतींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्थैर्य, सकारात्मक विचारसरणी आणि तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
'योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून जीवन जगण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्त्व अधिक वाढले असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे गरजेचे आहे,
तसेच, 'जागतिक योग दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नसून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश देणारा दिवस आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन शांत होते आणि दैनंदिन जीवनातील ताणतणावांवर मात करण्याची शक्ती मिळते. योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून स्वतःच्या आणि समाजाच्या उत्तम आरोग्यासाठी योगदान द्यावे.' या आशयाचे प्रतिपादन यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्री माने यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी, आयोजक, शिक्षकवृंद आणि स्वयंसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले. उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करून ‘योगमय जीवन – निरोगी जीवन’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ व २ येथील कार्यक्रमाचे नियोजन मा. किरण गाणबोटे, adv. मयुर शिंदे, मा. लखन जगताप यांनी केले होते तर चेतना महाविद्यालय प्रांगण येथील कार्यक्रम मा. राम आसबे, adv. मयुर शिंदे व मा. सचिन शिरसाट यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे आरोग्य, जागरूकता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा