Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २१ जून, २०२६

*विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन प्रात्यक्षिकासह उत्साहात साजरा*.

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*.

*दिनांक २१ जून २०२६*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*


विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात प्रात्यक्षिकासह साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि योगाचे महत्त्व पटवून द्यावे या उद्देशाने विशेष योग व प्राणायाम सत्राचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमात योगाचार्य विजय नवल पाटील, वर्षा ननवरे आणि चेतन सातारकर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, मुद्रा, प्राणायामाचे प्रकार तसेच योगाचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले

 



कार्यक्रम विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. ज्योती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी, सुदृढ आणि तणावमुक्त जीवनासाठी दररोज योग व प्राणायाम करण्याचे आवाहन केले. योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी ती अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संभाजी पवार तसेच दादासाहेब बर्डे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षक, विद्यार्थी व योग प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा