Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ जून, २०२६

*जि.प. समाज कल्याण" सभापती- संस्कृती सातपुते" यांनी माळशिरस तालुक्यातील रस्त्यासाठी आणला ग्रामविकास विभागाकडून १० कोटीचा निधी*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी तालुक्यातील २६ रस्त्यांच्या कामांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून साडे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याने तालुक्यातील अनेक छोट्या मोठ्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.

    माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच पत्नी असणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते त्यांच्या व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या माध्यमातून दमदार कामाला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

संस्कृती सातपुते यांनी  रेडे मेटकरवस्ती ग्रामा १६३ रस्त्यासाठी २५ लाख रुपये,पवारवस्ती गुरसाळे ते मुंजवडी ग्रामा २७७ साठी ५० लाख,कांरुडे रानगटवस्ती ग्रामा २७० साठी २५ लाख, कचरेवाडी ते इजिमा १०२ ग्रामा ४९९ साठी ३८ लाख रुपये,डोंबाळवाडी (जोडरस्ता) ते प्र.१८ ग्रामा १२९ साठी २५ लाख रुपये,एकशिव तांबेवाडी ते करालवस्ती रस्ता ग्रामा ६६९ साठी ५० लाख रुपये,पिलीव वाघमारे वस्ती ग्रा. मा. ३५२ साठी ३० लाख रुपये,जरगवस्ती ते रामा १४० ग्रा.मा. ४७३ साठी ३० लाख रुपये,गट नं.२ वंजरादेवी महालक्ष्मी ते हिंगणी ग्रा.मा. ५८५ साठी ३० लाख रुपये,तांदुळवाडी ते निलटेवस्ती ग्रा.मा. ६५ साठी ३० लाख रुपये, लोंढे मोहीतेवाडी गिरवी मायनर प्र.१०१ ग्रामा २६० साठी २५ लाख रुपये, एकशिव ते विरपुरी ग्रामा ७८ साठी ३० लाख रुपये, मोरोची ते सांळुकेवस्ती भिसे वस्ती साठी ५० लाख रुपये,किर्दकवस्ती दहिगाव ते रामा १२४ साठी ५० लाख रुपये, धर्मपुरी कर्चेवाडी प्ररामा १५ साठी ५० लाख रुपये, मोरोची सोनपेट रस्ता ग्रामा १४० साठी ५० लाख रुपये, इस्लामपुर ते भंडोबा देवस्थान प्र.११६ पवारवस्ती रस्ता साठी ५० लाख रुपये, दहिगांव पी. के. सावंतवस्ती रस्ता ग्रामा २९१ साठी ५० लाख रुपये,अलंकापुरी ते प्र.१७६ साठी ५० लाख रुपये,देशमुखवाडी आसु (जिल्हा हद्द) रस्ता ग्रामा २२८ साठी ५० लाख रुपये, कुरबावी हनुमानवाडी इमानवस्ती ग्रामा ६२० साठी ५० लाख रुपये, शिंदेवाडी ते हनुमानगांव ते देखमुखवस्ती जोडरस्ता ग्रामा ६६५ साठी ५० लाख रुपये,बाभुळगांव ते इंगळेवस्ती ग्रामा ४७४ साठी ५० लाख रुपये, नातेपुते दहिगांव ४३ फाटा ग्रामा २५७  साठी ५० लाख रुपये, महालक्ष्मी देवस्थान ते रामा १४० रस्ता ग्रामा १०३ साठी ५० लाख रुपये,

 फडतरी मठवस्ती चिंदादेवी ग्रामा २४९ साठी ५० लाख रुपये अशी २६ रस्त्यांची कामे असून त्यामध्ये काही रस्त्यांची तर काही त्याच्या दुरुस्तीची कामे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा