Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ जून, २०२६

*तुळजापूर येथील नगर परिषद .प्रा.शा.क्र.२ येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागत. विद्यार्थ्यांचे तुतारी- संबळाच्या निनादात स्वागत*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


तुळजापूर  येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे इ.१ली प्रवेशपात्र नवागत विद्यार्थ्यांचे तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच पालक मेळावा संपन्न झाला इ.१लीच्या विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेऊन औक्षवण करून पेढे व फुल देऊन स्वागत करण्यात आले. 



  यावेळी   विरोधी पक्षनेते अमोल भैय्या कुतवळ , भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष लखन झाडपिडे , केंद्रप्रमुख मोहन भोसले,युवा नेते गुलचंद व्यवहारे, प्रसाद पानपुडे, पालक महादेव चोपदार सेवानिवृत्ती शिक्षक बापू शिंदे उपस्थित होते. 

 सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 


 शाळेच्या पहिल्याच दिवशी इ.१ली प्रवेश पात्र सर्व विद्यार्थ्यांना स्कूलबॅकसह सर्व शैक्षणिक साहित्याची किट नागेश नाईक यांच्या वतीने वाटप करण्यात आले. 

  यावेळी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता यामध्ये विद्यार्थी व पालकांनी सेल्फी काढून शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा केला.

  या वेळी मुख्याध्यापक गणेश रोचकरी, सहशिक्षक महेंद्र पाटील,महेंद्र कावरे, बाळासाहेब जेटीथोर, सुरजमल शेटे, केरण लोहारे, सुज्ञानी गिराम, विद्यादेवी स्वामी, शिवा डाके उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा