Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जून, २०२६

*प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुलीची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या* *बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



उदयनगर चौंडेश्वर वाडी (ता.माळशिरस) येथील प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत १० जून २०२६ रोजी १०० टक्के कर्ज वसुलीचा मानाचा टप्पा गाठला आहे.संस्थेची सभासद संख्या ४०३ असून भागभांडवल रुपये १८,७१,१११ इतके आहे.संस्थेमार्फत एकूण रुपये २ कोटी ९० लाखांचे कर्जवाटप करण्यात आले होते. सर्व सभासदांनी वेळेत कर्जाची परतफेड केल्याने संस्था शंभर टक्के वसुलीपात्र ठरली.



                या यशामध्ये मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेचे बँक इन्स्पेक्टर रामचंद्र पवार शाखाधिकारी विजय कचरे,ज्युनीयर ऑफिसर वैजीनाथ पवार,कॅशियर मोहिनी खुडे,लिपिक आश्विनी मोरे,प्रियंका चव्हाण तसेच विश्वासू शिपाई सुदाम सावंत व महेंद्र गायकवाड यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

               यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव इंगवले देशमुख, व्हाईस चेअरमन विठ्ठलराव चव्हाण, तज्ज्ञ संचालक समाधान इंगवले देशमुख,हरिचंद्र किर्दकर,सदाशिव रिसवडकर,खंडाळी गावचे गटनेते अमर रिसवडकर,क्लार्क अविनाश साठे,भारत साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच भाऊसाहेब बाबर,भाऊसाहेब काटकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी  संस्थेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करून सभासदांनी दाखविलेल्या आर्थिक शिस्तीचे अभिनंदन केले.ग्रामीण भागातील सहकार चळवळीला बळकटी देणारी ही कामगिरी इतर संस्थांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा