Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ जून, २०२६

श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांना महाद्वारातून दर्शनासाठी सोडावे तुळजापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांची मागणी

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांना महाद्वारातूहन दर्शनासाठी सोडणे बाबत तुळजापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांची उपेंद्र तामोरे अप्पर जिल्हाधिकारी प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे याबाबत सविस्तर मागणी अशी की


, काही दिवसापासून मंदिर संस्थांनने महाद्वारातून दर्शनासाठी भाविकांना प्रतिबंधित केले आहे. कारण वरचेवर व अधिक महिन्यांमध्ये गर्दीमुळे दर्शन व्यवस्थेमध्ये बदल केल्याचे निर्णय घेतल्याचे कळते. परंतु संस्थानने व्हि.आय. पी / 500 रु पास/ 200 रु पास महाद्वारातून सोडतात. सर्व सामान्य भाविकांना दक्षिण पार्किंग वरून काळभैरवनाथा च्या मंदिरापासून सोडण्यात येत आहे. परंतु हे अंतर चालण्यास लांब पडत असल्याने व तशा सुविधा पण या ठिकाणी नसल्याने भाविकांना त्रास होत आहे. त्याचबरोबर व्यापायांना सुद्धा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. गर्दीच्या वेळी म्हणजेच नवरात्र, चैत्री पौर्णिमा, शाकंभरी नवरात्र मध्ये व्यवस्था दर्शन लाईव्ह योग्य आहे परंतु इतर वेळेस महाद्वारातून कल्लोळ तीर्थ, कदम पाटील वाडा व दर्शन मंडपात दर्शन रांग सोडण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली असून या निवेदनावर काँग्रेसचे मा. जिल्हाध्यक्ष धीरज पाटील नगरसेवक अमोल कुतवळ, नगरसेवक रणजीत इंगळे, नगरसेवक- आनंद जगताप, नगरसेवक अक्षय परमेश्वर, नगरसेवक प्रगती गोपाळ लोंढे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा