इंदापूर, डॉ. संदेश शहा.
दिनांक २१ जून २०२६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे कार्यरत असलेल्या सात मराठा लाईट इन्फंट्रीच्या सैनिकांना ऑनलाइन योग प्रशिक्षण दिल्या बद्दल इंदापूर येथील योग प्रशिक्षक प्रशांत गिड्डे यांचा बटालियनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
ऑनलाईन योग प्रशिक्षण या सेवाभावी कार्याची दखल घेत कमांडिंग ऑफिसर व
सर्व सैनिक बांधवांच्या वतीने योग प्रशिक्षक प्रशांत गिड्डे यांना स्मृती चिन्ह देऊन
गौरविण्यात आले.
दिनांक २१ जून या आंतरराष्ट्रीय योग
दिनानिमित्त इंदापूर येथे नगरपरिषद शाळा प्रांगणात झालेल्या
कार्यक्रमात बटालियनचे प्रतिनिधी
म्हणून सैनिक गणेश मोरे यांच्या हस्ते श्री. गिड्डे यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने,
जयकुमार शिंदे, माजी सैनिक महादेव सोमवंशी, रामेश्वर साठे,
बाजीराव शिंदे, शहनशहा मुजावर, राधिका विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक शरद झोळ व पतंजली योग समितीचे योग
शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
यावेळी प्रशांत गिड्डे यांनी या सन्मानाबद्दल सर्व अधिकारी व सैनिक बांधवांचे आभार मानत, हा आपल्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण असल्याची भावना व्यक्त केली. सैनिक हे देशाचे रक्षण करतात. त्याची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा