Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ जून, २०२६

मोहरम उत्सवा निमित्त करमाळ्यात मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा शहर व तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या करमाळा मोहरम उत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी पत्रकारांना दिली आहे. 

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा छत्रपती चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये हिंदू -मुस्लिम भाईचारा वाढीस लागण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये हिंदू मुस्लिम भाविकांना अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आलेले आहे. याबरोबरच थंड सरबतचेही वाटप करण्यात येणार आहे. हजरत हसन हुसेन यांच्या स्मरणार्थ उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांसाठी व गरजू साठी फळवाटप करण्यात येणार आहे. याशिवाय अनेक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. याबरोबरच मोहरम विसर्जनाच्या दिवशी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा छत्रपती चौक,करमाळा येथे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे यांनी दिली.

मोहरम उत्सव हा करमाळ्यातील हिंदु व मुस्लिम बांधवांचा ऐक्याचा सण असुन हे करमाळ्याचे विशेष वैशिष्ट्य आहे. याच वैशिष्ट्याचे जतन करून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश या सत्कार समारंभातून देण्यात येणार आहे व हिंदू-मुस्लिम भाई भाई च्या घोषणाही त्यावेळी देण्यात येणार आहेत. समाजामध्ये स्थिरता,समानता व बंधुभाव,बंधुत्व टिकण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन होणे फार गरजेचे आहे. यामुळ येणाऱ्या भावी पिढीला नवीन विचार व दिशा देण्याचे कार्य ही होणार आहे याच अनुषंगाने मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक आजी माजी पदाधिकारी व बांधवांचा सत्कार हिंदू बांधवांच्या हस्ते होणार आहे ही बाब करमाळ्यासाठी गौरवास्पद असणार आहे. यावेळी प्रा नागेश माने , प्रा संजय चौधरी , वरकटनेचे माजी सरपंच बापूसाहेब तनपुरे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब गोरे गुरुजी , संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, सतीश वीर सर, गणेश कुकडे , संतोष शितोळे सर , शरद जाधव सर, अजित कणसे सर , अशोक मचाले , दत्तात्रेय जाधव सर , अरुण टांगडे , बाळासाहेब झोळ (वाशिंबे ), अतुल निर्मळ , सुहास पोळ ,राज झिंजाडे ,  मराठा सेवा संघाचे व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा