Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ९ जुलै, २०२६

*नातेपुते येथील सामाजिक व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते निजाम काझी यांचे अपघाती मृत्यू*

 *नातेपुते प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



नातेपुते शहरातील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निजाम तथा कासम करीम काझी (वय ६७) यांचा मंगळवारी रात्री ९ वाजता अपघातात मृत्यू झाला. लोकशाहीर आण्णाभाऊ चौकातील अभिषेक शूज दुकानासमोर हायवाने त्यांच्या स्कुटीला धडक दिली.

निजाम काझी निष्ठावंत कार्यकर्ते

शंभू महादेव आखाड्याचे सक्रिय कार्यकर्ते निजाम तथा कासम करीम काझी हे आपल्या स्कुटी वरून मंगळवारी रात्री ८.५० च्या सुमारास रेणुका बँकेच्या रस्त्यावरून उमाजी नाईकनगर कडे जात होते. फलटणवरून येणाऱ्या हायवाने

त्यांना धडक दिली. स्कुटी वरील निजाम काझी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेत असताना मांडवे नजीकच त्यांचे निधन झाले.

बुधवारी (ता. ८) सकाळी ११ सामाजिक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे श्रद्धांजलीपर भाषणात मान्यवरांनी सांगितले. वाजता हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात माजी ग्रामपंचायत सदस्या पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, पाच भाऊ असा मोठा परिवार आहे. हायवा ट्रक चालक विठ्ठल तुकाराम गोफणे यांच्यावर नातेपुते पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निजाम काझी यांच्या जाण्याने शहरातील सामाजिक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याची श्रद्धांजलीपर भाषणात मान्यवर आणि सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा