*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
नंदीवाले समाजाची ३०० वर्षाची परंपरा असलेल्या अंबाजी-लिंबाजी यात्रेला प्रारंभ झाले असुन
२०जुलै२०२६ ते २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत यात्रा चालणार आहे
देवस्थानच्या जागेचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करून ही शासन दुर्लक्ष, करत असल्याचे अंबाजी लिंबाजी देवस्थान ट्रस्ट वडापुरी ता. इंदापूर जि. पुणे चे अध्यक्ष - दशरथ पवार यांनी खंत व्यक्त केली आहे
इंदापूर तालुक्यातील मौजे वडापुरी येथील तीनशे वर्षाची परंपरा असलेल्या नंदीवाला या समाजाचे आराध्य दैवत म्हणून देशभर प्रसिद्ध असलेली अंबाजी लिंबाजी यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा २० जुलै २०२६ ते २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे.
अंबाजी लिंबाजी हे भटक्या समाजातील लोकांचे दैवत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश मध्यप्रदेश सह संपूर्ण देशभरातून
यात्रेसाठी उपस्थिती लावत असतात अशी माहिती नंदीवाला समाजातील युवा नेते, यात्रा कमिटीचे सदस्य दशरथ पवार यांनी दिली आहे. लाखो यात्रेकरू अंबाजी लिंबाजी
यात्रेसाठी तब्बल तीन लाखाहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली आहे. ही यात्रा तब्बल एक ते दीड महिना चालणार असून या यात्रेमध्ये विविध सामाजिक उपक्रम यात्रा कमिटीचे सदस्य व नंदीवाला समाजाचे युवा नेते दशरथ पवारयांनी सांगितले आहे
सदरची यात्रा यशस्वी होण्यासाठी व यात्रेचे चोख नियोजन दशरथ पवार, मारुती बाघमोडे रामचंद्र वाघमोडे, लक्ष्मण वाघमोडे, अंबादास शेंडगे, रामचंद्र वाघमोडे, तय्याप्पा पवार, मोतीराम पवार कैलास पवार या जेष्ठ व अनुभवी व्यक्तींनी केले आहे.
सदरच्या यात्रेमध्ये एकमेकांच्यासमाजातील विविध मूलभूत प्रश्न, मुला मुलींचे लग्न जुळविणे, अडचणीत असलेल्या समाज बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्यातून मार्ग काढणे, देशभरातील समाज बांधवांशी संपर्कात राहणे व संपर्क साधने, समाजात निर्माण झालेला तेढ विचार विनिमय करून सोडवणे असे विविध उपक्रम राबवले जातात. सदर यात्रेसाठी इंदापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला
देवस्थानच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्षअंबाजी- लिंबाजी देवस्थानसाठी सदर यात्रा कमिटीच्या माध्यमातून वेळोवेळी यात्रेनिमित्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात पाठपुरावाही केला असताना. राज्य शासनाच्या सदर विभागाने या मागणीकडे सदैव दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे अंबाजी लिंबाजी देवस्थानला जागा देण्याचा विषय विधिमंडळातही काही महिन्यापूर्वी उपस्थित झाला होता. तरी सदर देवस्थानची प्रमुख अडचण म्हणजे देवस्थान साठी आवश्यक असलेला जागा हीच असून याकडे राज्यशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणी येणारा नंदीवाला समाज हा लाखोंच्या संख्येत असतो.
आहे. तर पंचायत समितीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व आरोग्याची काळजी घेतली
जात आहे. तसेच सदर यात्रेवर महसूल विभागाचे बारकाईने लक्ष आहे
अंबाजी - निंबाजी यात्रेत मूलभूत सुविधांचा अभाव.
अंबाजी- लिंबाजी देवस्थान यात्रेत तब्बल तीन लाखाहून अधिक नंदीवाला समाजातील लोकांनी उपस्थिती दर्शवली असताना. सदर लोकांना मूलभूत सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन सध्या अपयशी ठरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या यात्रेच्या अगोदर शासनाच्या माध्यमातून सार्वजनिक शौचालय उभारणे गरजेचे होते. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे असताना अतिशय तुटपुंज्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिले आहे.
या यात्रेनिमित्त या समाजाच्या तक्रारी बाबत वाचलेला पाढा
1) मौजे वडापुरी येथील अंबाजी लिंबाजी देवस्थान हे नंदीवाले समाजाचे कुलदैवत देवस्थान आहे
2) सुमारे 400 वर्ष पूर्वीपासून परंपरा असलेल्या अंबाजी लिंबाजी देवस्थान यात्रेला सुरुवात
3) देवस्थानसाठी मागणी केलेल्या जागेकडे राज्यशासन दुर्लक्ष करत आहे
4) अंबाजी लिंबाजी देवस्थान यात्रा व जत्रेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव
5) यात्रेच्या ठिकाणी नंदीवाले समाजातील लोकांना पाण्याची टंचाई आहे व पाणी पिण्यासाठी मिळत नाही. सरकार दुर्लक्ष करत आहे.
6) ही यात्रा व जत्रा तीन वर्षातून एकदा भरते.
7) या यात्रेला महाराष्ट्र सह देशभरातून नंदीवाले समाज एकत्र येतो
8) या जत्रेसाठी व यात्रेसाठी संबंधित विभागाकडून एक महिना सहा दिवसांसाठी परवानगी भेटलेली आहे
9) या जत्रेसाठी व यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने नंदीवाले समाज एकत्र येतो.
10) यात्रा व जत्रेच्या कालखंडात नंदीवाले समाज राहूटीची घरे बांधून वास्तव्य करतात
*या नंदी वाले समाजाने वारंवार पाठपुरावा करून या मागण्याच्या प्रती संबंधित खालील प्रशासनाला दिले आहे*
प्रति,
1) मा. सरपंच / ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे.
2) या. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे.
3) मा. तलाठी, तलाठी कार्यालय वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे.
4) मा. तहसीलदार, तहसील कार्यालय इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे.
5) मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे.
6) मा. कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे.
7) मा. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग कार्यालय, वडापुरी/ इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे.
अंबाजी लिंबाजी देवस्थान ट्रस्टचे
*अध्यक्ष* -श्री दशरथ पवार
*देवस्थान यात्रा कमिटी*
रामा वाघमोडे
लक्ष्मण वाघमोडे
अंबादास शेंडगे
रामभाऊ वाघमोडे
रामचंद्र वाघमोडे
राजाराम पवार
मारुती वाघमोडे
यल्लाप्पा वाघमोडे
अनिल वाघमारे
तायाप्पा पवार
मोतीराम पवार
सोपान पवार
मोतीराम वाघमोडे
रामा शिंदे
वसंत पवार
शांताराम पवार
प्रताप पवार








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा