*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो.9730867448*
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेचे संचालक वसंत पांडुरंग जाधव यांचे हस्ते करण्यात आले . कु.श्रेया काळे, कु.प्रगती मासाळ, कु.आयेशा सय्यद व कु .कावेरी साठे या अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थिनींचा व पालकांचा सत्कार सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन करण्यात आला .त्याचबरोबर विषयात प्रथम आलेल्या कु.विनिया बनकर,अनुष्का लोखंडे,सृष्टी गायकवाड ,सृष्टी खुडे ,कृष्णा घुले ,प्राजक्ता ढगे या विद्यार्थिनीचाही सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना
विनोद जाधव म्हणाले की जिद्द व चिकाटीच्या जोरावर विद्यार्थिनींना आयुष्यात यश संपादन करून भविष्य उज्वल करावे
प्रशालेतील यशस्वी सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते- पाटील ,अध्यक्ष -.संग्रामसिंह मोहिते -पाटील,संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील,सदाशिवराव माने विद्यालयाचे सभापती चि .सयाजीराजे मोहिते - पाटील ,सचिव -अभिजीत रणवरे ,सहसचिव - हर्षवर्धन खराडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केलेले आहे .
या कार्यक्रमासाठी विनोद जाधव व यशस्वी विद्यार्थिनींचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता पवार मॅडम , यांनी केले मनोगत कोळी सर व्यक्त केले तर ,सूत्रसंचालन सहशिक्षिका रचना रणनवरे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन वृषाली थोरात मॅडम यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा