*करमाळा -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
मे.आर एच सायंटिफिक इंडिया प्रा. लि. द्वारे २८.८० कोटींच्या शासकीय निधीचा अपहार, निकृष्ट यंत्रसामग्रीचा पुरवठा आणि महाघोटाळ्याबाबत फौजदारी गुन्हे दाखल करून मालमत्ता जप्त करावी अशी मागणी जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक /अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी निवेदनाद्वारे
प्रति,
दिनांक :- २४/०४/२०२६
१. मा. राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्य, राजभवन, मुंबई.
२. मा. लोकायुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
३. मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
४. मा. उपमुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
५. मा. मंत्री, वैद्यकीय व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
७. मा. प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. मा. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष, मुंबई.
९. मा. महासंचालक, लाचलुचपत शिक्षण प्रतिबंधक विभाग (ACB), महाराष्ट्र राज्य.
१०. मा. केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC), नवी दिल्ली.
११. मा. संचालक, सक्तवसुली संचालनालय (ED), मुंबई विभाग.
मध्यवर्ती टपाल केंद्र मुख्यमंत्री सचिवाल महाराष्ट्र शासन
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
इत्यादी ना केली असून
संबंधित रुग्णालय प्रमुख (अधिष्ठाता):
१. मा. अधिष्ठाता, सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबई.
२. मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
३. मा. अधिष्ठाता, सी.पी.आर. रुग्णालय, कोल्हापूर.
४. मा. अधिष्ठाता, पी.ए.एच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती.
टपाल केंद्र, मंत्रालय, ७ज्य सचिव कार्यालय (सा.प्र.वि) हे आहेत
संदर्भ: पुरवठा आदेश क्र. DMER-PROCUREMENT-1/M/PURCHASE ORDER/14643/2024, दि. 11/10/2024.
याबाबत निवेदनाद्वारे केलेली मागणी अशी कीआपल्या विभागांतर्गत सुरु असलेल्या एका संघटित भ्रष्टाचाराकडे आपले लक्ष वेधत आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (DMER) सार्वजनिक आरोग्यासाठी दिलेल्या १२८.८० कोर्टीच्या निविदेत मे. आर एच सायंटिफिक इंडिया प्रा. लि. (संचालकः रोहित गवळी व हमीद सय्यद) यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून सरकारी तिजोरीची लूट केली आहे
तक्रारीचे मुख्य मुद्देः
१. शासकीय निधीचा अपहारः कामाची १००% पूर्तता नसताना आणि निकृष्ट मालाचा पुरवठा केलेला असतानाही कंत्राटदाराने ८०% निधी (अंदाजे २३ कोटी) बेकायदेशीररीत्या हडप केला आहे.
२. रुग्णांच्या जिवाशी खेळः आय. व्ही. एफ. (IVF) केंद्रासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाची मशीन्स बसवून गोरगरीब रुग्णांचे आरोग्य धोक्यात आणले आहे.
३. बेकायदेशीर आर्थिक लाभः वर्क ऑर्डरमधील 'पेमेंट अटी' धाब्यावर बसवून भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला कोट्यवधींचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे जनशक्ती संघटनेची मागणी पुढील प्रमाणे आहे
१. मालमत्ता व खाती जप्त (Seize/Freeze) करणेः कंत्राटदार कंपनी 'आर एच सायंटिफिक इंडिया प्रा. लि.' आणि त्यांचे संचालक रोहित गवळी व हमीद सय्यद यांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून कमावलेली सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्काळ जप्त करावी, यामध्ये कंपनीच्या व संचालकांच्या नावावर असणारे प्लॉट्स, आलिशान गाड्या (Luxury Cars) आणि सर्व बैंक खाती यांचा समावेश असून, ती त्वरित गोठवण्यात (Freeze) यावीत.
२. फौजदारी कारवाई: कंपनीच्या संचालकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.
3. अधिकाऱ्यांचे निलंबनः या घोटाळ्यात सामील असलेल्या DMER च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना चौकशी पूर्ण होईपर्यत निलंबित करावे.
४. काळ्या यादीत समावेशः सदर कंपनीला कायमस्वरूपी 'काळ्या यादीत' (Blacklist) टाकून त्यांच्याकडून व्याजासह रकमेची वसुली करावी.
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, जनहितार्थ १५ दिवसांत योग्य कार्यवाही न झाल्यास, 'जनशक्ती शेतकरी संघटना राज्यभर 'जेल भरो' आंदोलन छेडेल. असा इशारा जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी निवेदनात दिला आहे






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा