इंदापूर, डॉ. संदेश शहा.
मंगळवार, ७ जुलै २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९
इंदापूर तालुक्यातील रेडा गावामधून सालाबादप्रमाणे श्री संत गुलाबबाबा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र गुलाबनगर ( रेडा ) ते श्री क्षेत्र पंढरपूर हा आषाढ शुक्ल रविवार दि.१९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये भारतातील विविध राज्यातून श्री संत गुलाबबाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ॲड गोपाल उमक ( अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा समाधी मंदिर ट्रस्ट श्री क्षेत्र टाकरखेड ( मोरे ) ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती ), श्री संत गुलाबबाबा यांचे वंशज तसेच प्रा. नरेंद्र पलांदुकर ( अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा ) तसेच चंद्रकुमार अग्रवाल ( विश्वस्त सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबा समाधी मंदिर टाकरखेडा ( मोरे ) अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा प्रतिष्ठान पंढरपूर ) यांच्या हस्ते या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे
या पालखी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विश्वासराव पवार, गोपाल रोकडे ( पुणे ), उद्योजक रमेश हिरे, डॉ. शिवाजीराव पाटील सचिव श्री संत गुलाबबाबा प्रतिष्ठान पंढरपूर, पैलवान दामोदर वानखडे (आमला, दर्यापूर), गोपाल कोलते ( मलकापूर ) शाहीर मुरलीधर लोणाग्रे मुख्य प्रचारक श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम, उद्योजक कमलाकर बागुल ( नंदुरबार ), प्रकाश देशमुख मुख्य प्रवर्तक बँक ऑफ बडोदा,
मुंबई, उद्योजक (अलिबाग ), निशिकांत लाड, पै. अशिष शिरगावकर ( वस्ताद ), उद्योजक, प्रशांत अंकुशराव ( झी मिडिया,मुंबई ),
राजाभाऊ एकनाथ जाधव ( कोपरगाव ) मनोहर म्हात्रे, भूषण शिंदे, भगवान म्हात्रे, संतोष राऊत (अलिबाग), हेमंत पाटील, मनोज म्हात्रे, प्रकाश मिसाळ, आर. जी. पाटील, (नंदुरबार), विलास रघुवंशी माजी नगरसेवक (नंदुरबार), मोहन क्षिरसागर ( सुरत ), अभिजीत गुरव, धनंजय घाग, संजय देसाई, संजय थोरात, सत्यवान पाटील (मुंबई) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पालखी मुक्काम पुढील प्रमाणे होणार आहे. १९ जुलै रोजी मुक्काम मारुती मंदिर, रेडा, २० जुलै -सराटी, २१ जुलै मायनर सेक्शन ( महाळुंग ), २२ जुलै वाघजाई वस्ती ( बंडीशेगांव ), २३ जुलै -वाखरी, २४ जुलै ते २६ जुलै श्री संत गुलाबबाबा आश्रम पंढरपूर गोपाळपूर या ठिकाणी मुक्काम होणार असून, गोपाल काळा झाल्यानंतर पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
पालखी सोहळ्यामध्ये
ह.भ.प.रणजित महाराज शिंदे ( जंक्शन ), ह.भ.प.बोधले महाराज( वडापुरी ), ह.भ.प.मोहन महाराज बुधावले ( पिराळे ),
ह.भ.प. नागरगोजे महाराज (आळंदी),
ह.भ.प. अशोक महाराज मोहिते (झी टॉकीज फेम रेडा, ता.इंदापूर, पुणे ), प्रसिद्ध लोकशाहीर, ह.भ.प.मुरलीधर लोणाग्रे महाराज ( तेल्हारा ) मुख्य प्रचारक श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम, ह.भ.प. समर्थ महाराज साळुंखे ( दौंड ), यांची कीर्तन सेवा होणार असल्याची माहिती श्री संत
गुलाबबाबा संस्थानचे व पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ॲड तानाजीराव देवकर, सचिव तुकाराम जगदाळे यांनी दिली. यावेळी संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार ज्ञानदेव
गोळे, बाळासाहेब कुंभार आदी
विश्वस्त मंडळी उपस्थित होती.
सदर पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून, देशातून श्री संत गुलाबबाबाचे भक्त सामील होणार आहेत. भक्तांनी या पालखी सोहळ्याचा सेवेचा, भक्तीचा अनुभव घ्यावा असे पालखी सोहळ्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा