*नळदुर्ग-प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव ही संस्था गेली ३० वर्षेह सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. महिला सक्षमीकरण, पाणी व्यवस्थापन,पर्यावरण, पंचायत राज, व्यसनमुक्ती,इत्यादी विषयात काम करीत असून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना उत्तेजन देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांना मिळावी या हेतूने सन २००२ पासून परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे याही वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन अशा मान्यवरांना सन्मानित येणार आहे. तरी कला, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य, युवा, व्यसनमुक्ती,उत्कृष्ट कामगिरी केलेले सरपंच, उद्योजक यांनी आपले प्रस्ताव दिनांक २५ जुलै २०२६ पर्यंत मारुती बनसोडे सचिव, परिवर्तन सामाजिक संस्था व्यंकटेश नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव ४१३६०२ . मो.नं.9604166899 या पत्त्यावर पाठवावे असे आवाहन परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांनी केले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा