Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ जुलै, २०२६

.*ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त रुग्णांना फळे वाटप करून सेवा उपक्रम साजरा*

 *अकलूज प्रतिनिधी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


आज अकलूज उपजिल्हा रुग्णालय येथे भारतरत्न, भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच रुग्णांना फळवाटप करून समाजसेवेचा उपक्रम राबविण्यात आला.


यावेळी उपस्थित नागरिकांना डॉ. कलाम यांच्या विचारांचा व जीवनकार्याचा संदेश देण्यात आला. शिक्षण, विज्ञान, राष्ट्रप्रेम, प्रामाणिकपणा आणि युवकांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, हा त्यांचा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.श


या कार्यक्रमाचे आयोजन अमर आदम शेख

अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा, अकलूज यांच्या वतीने करण्यात आले.


या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये , ज्योतीदेवी माने पाटील, महादेव कावळे.डॉ. निलेश ननवरे, विक्रम गायकवाड, राहुल लोंढे, दिपाली वाघमोडे, दिपाली माने देशमुख, जयश्री एकतपुरे, जावेद बागवान, डॉ. अक्षय वायकर, अमोल माने, संतोष टकले, संतोष वाघमोडे, कोमल भोसले, श्रीकांत दोरकर, चेतन पवार, गणेश काळे, तुषार लोंढे, अक्षय कदम, राहुल भोसले, भोला भोसले, गोल्डन जाधव, निलेश वाडकर, एकनाथ जगताप, शुभम सूर्यवंशी, जतीन वायदंडे, बबलू ननवरे, नवनाथ साठे, दिलीप बनकर, संजय एकतपुरे, तेजस उबाळे, अमर खंडागळे, महावीर खंडागळे आणि रोहन लोहार उपस्थित होते.

"स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात; स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत."

— भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा