*लोहारा ,प्रतिनिधी --यशवंत भुसारे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
लोहारा पोलिस ठाण्यात कार्यरत
असलेले कर्तव्यदक्ष व मनमिळावू पोलिस हवालदार योगेश गुरव (वय ४२) यांचे गुरुवार, दि. २ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अपघातात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने लोहारा पोलिस दलासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, योगेश गुरव हे दुचाकीवरून जात असताना लोहारा एस.टी.बसस्थानका जवळ त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
कर्तव्याला सदैव प्राधान्य देणारे, सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे आणि जनतेशी आपुलकीने वागणारे पोलिस हवालदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने लोहारा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पवार यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्याला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मूळगाव उमरगा येथील स्मशानभूमीत नातेवाईक, मित्रपरिवार, पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश गुरव यांच्या अकाली निधनाने एक कर्तव्यनिष्ठ पोलिस कर्मचारी, प्रेमळ कुटुंबवत्सल आणि विश्वासू सहकारी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा