Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ जुलै, २०२६

मोहरम सणाचे औचित्य साधून वली बाबा दर्गा येथून निघणार आज मौलाअली पंजाची मिरवणूक Head

 *करमाळा तालुका -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो;-9850686360*


आवाटी येथे हजरत वली बाबा दर्गाह येथून हजरत हसन तसेच हजरत हुसेन व मौलाअली यांच्या पंजाची मिरवणूक आज वली बाबा दर्गा येथून सायंकाळी साडेचार वाजता निघणार असल्याची माहिती वली बाबा चे खादीम गुलाम नबी कादरी तसेच इरफान कादरी यांनी बोलताना दिली 

याबाबत अधिक माहिती देताना वली बाबाचे खादिम गुलामनबी कादरी तसेच इरफान कादरी म्हणाले की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोहरम सणाचे औचित्य साधून हजरत वली चांद पाशा दर्गा येथून सवारीची स्वाद्य मिरवणूक निघणार असून सदर पंजाची मिरवणूक वलीबाबा दर्गा येथून निघून आवाटी गावातील ग्रामदैवत हजरत आबिद अली शाह कादरी यांच्या फातिहाखाणी कार्यक्रमानंतर सदर सवारीची मिरवणूक संपूर्ण गावांमधून निघून शेवटी दर्गा येथे सवारी चा समारोप होतो यावेळी सवारी च्या दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांना शरबत वाटप होणार असल्याचे खादीम यांनी बोलताना सांगितले सदर सवारी चे दर्शन घेण्यासाठी बार्शी, कुर्डूवाडी, अंबाजोगाई, पुणे, मुंबई, अहिल्यानगर धाराशिव परंडा तसेच करमाळा शहर तसेच तालुक्यातील असंख्य भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असणार असल्याची माहिती खादीम यांनी बोलताना सांगितली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा