*कार्यकारी संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
आपणास वाईट मित्राच्या संगतीने व्यसनाची सवय लागते. कोणतेही नशा करू नका, नाहीतर जीवनाची दुर्दशा होईल अशा पासून वाचले पाहिजे असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी अनिता दीदी यांनी केले.
प्रजापती ब्रह्माकुमारीज ईश्वरीय, विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान शाखा टेंभुर्णी यांचे वतीने चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नरसिंहपूर येथील विद्यार्थ्यांना नशा मुक्त भारत अभियान व मिशन याबाबत सविस्तर माहिती सांगितली. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अंकुश पडळकर सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजापती ब्रह्माकुमारीज ईश्वरीय, विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान शाखा टेंभुर्णी यांचे ब्रह्माकुमारी अनिता दीदी, सुनीता माताजी, साधक चौधरी, साधक लोंढे आदी उपस्थित होते.
फोटो - नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी दिसत आहेत.
------------------------------------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा