Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

*पुण्यात राहुल गांधी यांच्या "छात्रों की गुंज" या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अ.भा.वि.प. . च्या तक्रारीनंतर युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!*

 *मुख्यसंपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


राहुल गांधी यांच्या 'छात्रो की गूंज' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात सीओईपी परिसरातील कथित गोंधळाप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (All India Student Council) करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

सीओईपीमधील (COEP) काही विद्यार्थिनींनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ 'छात्रो की गूंज'शी संबंधित रील्स तयार केल्या होत्या. या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाला पाठिंबाही दर्शवला होता. मात्र, विद्यार्थिनींवर कार्यक्रमाला उपस्थित राहू नये यासाठी काही उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून आणि अभाविपकडून दबाव आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, सीओईपी हॉस्टेलमधील एका विद्यार्थिनीवर दबाव टाकून तिच्याकडून व्हिडीओ स्टेटमेंट घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत विचारपूस आणि चर्चा करण्यासाठी अभाविपचे काही कार्यकर्ते हॉस्टेलमध्ये गेले असता, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ११५ (२), १८९ (१), १८९ (२), १९१ (२), ३५१ (१) आणि ३५२, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३७ (३) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा