इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
रविवार, ३० ऑगस्ट २६
सहसंपादक, मो. 9922419159
इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पुनर्वसित पाणलोट क्षेत्रातील रवींद्र काळे यांची प्रशासकीय अधिकारी वर्ग १ कोकण विभाग ठाणे येथे रवींद्र काळे यांची प्रशासकीय अधिकारी पदी नियुक्ती झाल्या बद्दल पळसदेव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक भूषण काळे यांच्या हस्ते तसेच संजय शेलार, मधुकर रंधवे, देविदास बांडे, राजेंद्र काळे, वामन गांधले, मल्हारी काळे, संपत येडे, पवार चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रामदास पवार, अण्णा नायकवडी, मेघराज कुचेकर, सनी कुचेकर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रवींद्र काळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भूषण काळे म्हणाले, पळसदेव हे पळसनाथांचे गाव म्हणून ओळखले जाते. येथील लोकांनी उजनी धरणासाठी त्याग केला. मात्र या पवित्र पळसदेव भूमीचा नावलौकिक वाढविण्याचे काम रवींद्र काळे यांनी केले असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
सत्कारमूर्ती रवींद्र काळे म्हणाले, मूळचा शेतकरी कुटुंबातील असल्याने तसेच उजनीचा भूमीपुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी, संघर्ष व व्यथा याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे शेतकरी सुखी तरच जग सुखी या तत्वाने आपण सर्वत्र सेवा दिली. त्या सेवेचे फळ म्हणून आपली प्रशासकीय अधिकारी वर्ग एक म्हणून निवड झाली आहे. पळसदेव ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांनी केलेला माझा सत्कार हा घराचा सत्कार असून मी सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो.
रवींद्र काळे यांनी सहायक प्रशासकीय अधिकारी म्हणून कृषी आयुक्तालय पुणे, विभागीय कृषी सहसंचालक पुणे येथे सेवा बजावली. श्री. काळे यांनी १९९७ ला रत्नागिरी जिल्ह्यातून सहायक अधिक्षक म्हणून कृषी विभागात सेवा केली. त्यानंतर सुमारे २९ वर्ष सेवा केल्यावर पदोन्नतीने त्यांची नुकतीच प्रशासकीय अधिकारी म्हणून ठाणे येथे नियुक्ती झाली. त्यामुळे पळसदेव पंचक्रोशीत आनंद व्यक्त करण्यात आला.
फोटो - रवीद्र काळे यांचा प्रशासकीय अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल पळसदेव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करताना कर्मयोगी कारखान्याचे संचालक भूषण काळे व मान्यवर.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा