इंदापूर, डॉ. संदेश शहा.
शनिवार १ ऑगस्ट २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
वारकऱ्यांची आरोग्य सेवा म्हणजेच श्री पांडुरंगाची सेवा केंद्रबिंदू मानून रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक संतोष राजगुरू २२ वर्षापासून वारकऱ्यांची आरोग्य सेवा करत आहेत. या विधायक व आदर्श कार्याबद्दल इंदापूर तालुक्यातील
निमगाव केतकी ग्रामस्थांच्या वतीने संतोष राजगुरू यांचा सत्कार करण्यात आला. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, बीड जिल्हा सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे, केतकेश्वर यात्रा कमिटीचे सचिव मारुती घनवट, गजराज परिवाराचे सर्वेसर्वा संदीप भोंग, उद्योजक माजी ग्रामपंचायत सदस्य माणिक भोंग यांच्या हस्ते श्री. राजगुरू यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लक्ष्मण फरांदे, अक्षय चिखले, संतोष ननवरे, उद्योजक दीपक भोंग, सुनील मोरे,
केतकेश्वर महाराज यात्रा कमिटीचे सचिव संतोष घनवट, एडवोकेट तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू भोंग, युवक नेते महेश जठार, पक्षी मित्र धनंजय राऊत, लक्ष्मण फरांदे उपस्थित होते. संतोष राजगुरु हे रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या जागतिक स्तरावर आरोग्य प्रदान करणाऱ्या संस्थेबरोबर काम करत असून संस्थेचे हे सेवेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. श्री. राजगुरू हे देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर रेड स्वस्तिक च्या माध्यमातून बावीस वर्षापासून वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा आरोग्य शिबिराव्दारे करत आहेत. त्यांच्याबरोबर दोन ॲम्बुलन्स आणि मेडिकलचा एकूण १४ लोकांचे पथक त्यांच्या बरोबर असते. वारकऱ्यांची सेवा करण्यास ते प्राधान्य देतात. रेड स्वस्तिक संस्थेचे संस्थापक डॉ. टी. एस. भाल हे माजी आयपीएस अधिकारी आहेत तर रेड स्वस्तिक चे अखिल भारतीयचे अध्यक्ष तथा महिला गृह उद्योग लिज्जत पापडचे एम.डी सुरेश कोते, महाव्यवस्थापक अशोक शिंदे, कार्याध्यक्ष भगवान राऊत, वरिष्ठ पदाधिकारी प्रमोद चौगुले, राज्याचे अध्यक्ष श्री. गोरे, नॅशनल प्रोजेक्ट डायरेक्टर दीपक पाटील, जिल्हाध्यक्ष संतोष बारणे, पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष डॉ. उमाकांत वाबळे, डॉ. संतोष सुपे, डॉ. बबनराव डोळस, स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्मिता वाबळे, डॉ. अनुराधा डोळस. डॉ. सांडभोर मेडिकल ऑफिसर म्हणून माजी आरोग्य उपसंचालक डॉ. दत्ता खुणे, पुणे शहराचे माजी सेक्रेटरी जयसिंग पवार, हभप श्रीकांत माळी महाराज, दत्ता माने, विजय पायमले, अभिजीत बेलेकर, नितीन उकिरे, गजानन गोरे, रेखा गोरे, राजू बेडगे हे पथक वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देते. महाराष्ट्र केमिस्ट ड्रगिष्ट असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांची औषधासाठी अनमोल मदत होते. रेड स्वस्तिक चे पुणे सचिव कमलेश राक्षे यांनी दोन ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली. या सर्वांच्या मी ऋणात राहू इच्छितो. यंदा रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे, दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, जगद्गुरु तुकाराम महाराज देहू संस्थानचे अध्यक्ष, जालिंदर मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प प्रशांत महाराज मोरे, तुकाराम महाराज देहू संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे संपर्क अधिकारी शरद रासकर यांनी भेट देऊन कौतुक केल्याचे श्री. राजगुरू यांनी सत्कार प्रसंगी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा