Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

जीवशास्त्र क्षेत्रातील संशोधनाला सुवर्ण यश: अमोल बंडगर यांना ऑलिम्पियाड परीक्षा परिषदेकडून मानद विद्यावाचस्पती पदवी प्रदान

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी  *मो-9730867448*



पुणे – शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिष्टीत 'मानद विद्यावाचस्पती' (ऑनररी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) पदवीने अमोल बाळासाहेब बंडगर यांना सन्मानित करण्यात आले आहे. 'ऑलिम्पियाड परीक्षा परिषद' या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थेतर्फे आयोजित चौथ्या वार्षिक दीक्षांत समारंभात ही प्रतिष्ठित पदवी प्रदान करण्यात आली.


अमोल बंडगर यांनी जीवशास्त्र (बायोलॉजी) क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन करून बहुमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे. हा दीक्षांत समारंभ नुकताच पुण्यात पार पडला, जिथे संस्थेच्या कुलपतींनी त्यांच्या हस्ते बंडगर यांना पदवी आणि मानपत्र बहाल केले.


या सोहळ्यात परिषदेचे कुलगुरू प्रा. डॉ. आचार्य जगदिश, कुलपती प्रा. डॉ. स्टीफन रेस्लर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ आणि इतर पदवीधारक उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी बंडगर यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

अमोल बंडगर यांनी ही पदवी स्वीकारताना त्यांचे आई-वडील, कुटुंबीय, गुरुजन आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आभार मानले. त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीमुळेच हे यश प्राप्त करणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्री रामदास देशमुख, सचिव श्री. भारत कारंडे  ,सदस्य श्री.यशराज देशमुख  श्री .मोरे सर शाळा विकास व प्रशासन अधिकारी प्राचार्य श्री. बनसोडे सर, उपप्राचार्य श्री. गवळी सर पर्यवेक्षक श्री. गुरव सर, संस्था मान्य पर्यवेक्षक श्री.शेंडे सर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी  , श्रीपूर महाळुंग परिसरातील सर्व नागरिक आणि इतर सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

विशेष मुद्दे:

क्षेत्र: जीवशास्त्र (बायोलॉजी)पुरस्कार: मानद विद्यावाचस्पती (ऑनररी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी)संस्था: ऑलिम्पियाड परीक्षा परिषद (भारत सरकार मान्यताप्राप्त)समारंभ: चौथा वार्षिक दीक्षांत समारोह, पुणे 

अमोल बंडगर: शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठित युवा व्यक्तिमत्त्व

अमोल बंडगर यांचे हे यश तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहे. जीवशास्त्र क्षेत्रात अधिक संशोधन आणि विकास करण्यासाठी त्यांच्या कार्याचा महत्त्वपूर्ण उपयोग होईल, असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस  हार्दिक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा